पाच मिनिटं अजून बसून रहा. आता संन्यासी येथे कीर्तन करतील. त्यांच्या कीर्तनाचा प्रसाद घेऊन घरी परता.कृष्णाच्या दृष्टीने समत्वबुद्धी हे समस्त याेगांचे सार आहे. या आधीच्या सूत्रातही निरनिराळ्या दारांनी समत्वबुद्धीच्या मंदिरातच जाण्याची याेजना कृष्णाने सांगितली आहे. या सूत्रातही पुन्हा त्याने आणखी एका वेगळ्याच दिशेने समत्वबुद्धीची घाेषणा केली आहे. विविध अंगांनी समत्वबुद्धीची चर्चा करायचे प्रयाेजन आहे. प्रयाेजनं वेगवेगळी आहेत. कारण व्य्नती वेगवेगळ्या प्रकारच्या अन् वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या असतात.समत्वबुद्धीचा परिणाम तर एकच असेल, मात्र प्रवास वेगवेगळ्या रस्त्यांवरून हाेईल. हे श्नय आहे की काेणी एखादा सुखदु:खांबाबत तितकासा संवेदनशील नसेलही. आपल्या सर्वांच्या संवेदनशीलता, सेंसिटीव्हिटीज् वेगवेगळ्या आहेत.
एखाद्या व्य्नतीला सुखदु:खाचा रस्ता महत्त्वाचा न वाटता यश-अपयशांचा रस्ता जास्त महत्त्वपूर्ण वाटणे श्नय आहे. आपण म्हणाल, ‘यश म्हणजेच तर सुख आहे आणि अपयश म्हणजे दु:ख आहे.’ पण थाेड्या बारकाईने पाहिल्यास फरक लक्षात येईल.असं हाेऊ शकतं की, एखादी व्य्नती यश मिळविण्यासाठी वाटेल तेवढे दु:ख झेलायला तयार असते. अन् असंही हाेऊ शकतं की, दुसरी एखादी व्य्नती अपयश मिळू नये यासाठी वाटेल तेवढे दु:ख झेलायला तयार असेल. याच्या उलटही असू शकेल. अशी व्य्नती असू शकते जी आपल्या सुखासाठी वाटेल तितकं अपयश पचवायला तयार असेल. अशी पण व्य्नती असू शकेल जी दु:खापासून वाचण्यासाठी वाटेल तितकं यश खर्ची टाकायला तयार असेल.