नाेकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असेल तिथे आपण जाताे; त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहातात तिथे आपण जावे.परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संताकडे जाणेच जरूर आहे. तुम्ही सर्व जागा पाहिली, आणि संत जिथे उभे आहेत तेवढीच जागा जर नाही पाहिली, तर बाकीच्या जागा पाहिल्याचा काय उपयाेग ? संतांचे अस्तित्व त्यांच्या देहांत नसून त्यांच्या वचनांत आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झाेपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात, तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झाेपी गेलाे असताना ते आपली वृत्ती तपासतात. एका बाईला मूल झाले. पण त्याला आकडी येऊ लागली, आणि ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे. ते मूल बराेबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते.
शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती हाेत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती हाेत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापाेटीच शिष्याला सजवील आणि त्याचे काैतुक करील.संतांना ारसे कधी काेणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षाकरण्याकरिता सांगितले नसून, त्यांचा त्या दृष्टीने उपयाेगही हाेत नाही; त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितले आहेत. संतांजवळ राहणाऱ्या लाेकांना तीन ताेटे आणि तीन ायदे असतात.त्यांपैकी ताेटे असे:- एक, वेदान्त बाेलायला तेवढा उत्तम येताे; दाेन, संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळताे, आणि तीन, ते म्हणजे संत. सर्व पाहून घेतील या खाेट्या भावनेने हा वाटेल तसे वागताे.
ायदे : पहिला म्हणजे, ताे जर खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच, काही साधना न करतासुद्धा त्याचा परमार्थ साधेल; दुसरे, त्याला मान मिळेल, पण ताे स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील; आणि तिसरे, वेदान्त त्याला बाेलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहाणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये, आणि ारसा वेदान्त बाेलू नये, ताेंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थाेडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही.