भगवद्गीतेत धृतराष्ट्राची भूमिका ही किती वेगळी आहे हे आपण मागे पाहिले आहे. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यांतील संवाद संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, अशी मूळ कल्पना. पण हा संवाद ऐकताना संजय वारंवार राेमांचित झाला. त्या प्रेमात गुंतून गेला. त्याला असे वाटले की, आपल्या मालकाने म्हणजे धृतराष्ट्रानेही या संधीचा ायदा घ्यावा. पण अशा प्रसंगी धृतराष्ट्र हा मख्खपणे बसलेला त्याने पाहिला.त्याची ही स्थिती पाहून संजयास वाईट वाटले. ताे म्हणाला की, धृतराष्ट्रा, सर्व विश्व हे परमात्म्याने नटले आहे. याचा अनुभव पंडूच्या मुलाने म्हणजे अर्जुनाने घेतला, पण तू त्याचा काय लाभ घेतलास? संजयाच्या या बाेलण्यावर धृतराष्ट्र स्तब्ध राहिला. याचे दु:ख संजयाला ार झाले. ताे मनात म्हणाला, असले भाग्य दवडणे हे याेग्य आहे का? हा धृतराष्ट्र अंत:करणाने समजदार आहे, बाेधाची याेग्यता याला कळेल, असे मला वाटले हाेते.
पण हा उदासीनच दिसताे. त्याची उदास वृत्ती पाहून मला असे वाटले की, हा चर्मचक्षूंनी जसा आंधळा आहे, तसे याचे ज्ञानचक्षूही अंध आहेत.यानंतर अध्याय संपवताना ज्ञानेश्वर म्हणतात, संजयाचे बाेलणे राहू द्यात. या अर्जुनाने मात्र आपले हित साधले आहे. या विभूतींचा अनुभव आल्यावर याला आणखी एक इच्छा निर्माण झाली आहे. आपल्या चर्मचक्षूंनी भगवंतांच्या सर्व विभूती पाहाव्यात, म्हणजे विश्वरूप पाहावे, अशी याची कल्पना आहे. अर्जुन हा कल्पतरूची ांदी असल्याकारणाने तिला ुले येणारच.मला विश्वरूप दाखवा, असे अर्जुनाने कृष्णास पुढल्याच अध्यायात म्हटले आहे.