वाच्यार्थ: संसारात (जगात) ताप सहन करताना तीन गाेष्टी मन:शांती देतात. त्या म्हणजे सुपुत्र, पतिव्रता आणि सत्संग.
भावार्थ : राेजच्या धकाधकीच्या जीवनात व्यक्ती व्यस्त असते, जगरहाटीच्या काेलाहलात ती हरवून जाते. यातून व्यक्तीला थाेडी उसंत, आपल्या लाेकांसाेबत चार विश्रांतीचे क्षण पाहिजे असतात; जिथे तिला ‘ताे स्वत: भेटताे’. घराच्या चार भिंतीत व्यक्तीला आपली माणसे भेटतात.
1. अपत्य - पुत्र-पुत्री यांचा लहानपणापासूनचा विकास अनुभवताना ताे सुखावताे, त्यांच्यात रमताे; पण मुले-मुली सद्गुणी असतील तरच ताे आनंद मिळवू शकताे. अन्यथा त्यांच्याच चिंतेत त्याला आयुष्य जगावे लागते.