लाेकी ते स्वलाेकता । समीप ते समीपता । स्वरूप हाेणे स्वरूपता ।।2।।

14 Feb 2023 16:33:32
 
 

saint 
 
आज माणूस अंतरिक्षात आणि चंद्रावर पाेचल्यानंतर ते जरी कालबाह्य व पुराणकथा वाटले तरी दासबाेधातील ते वर्णन वाचण्याजाेगे आणि श्रीसमर्थांच्या काव्यात्मकतेचा अनुभव देणारे आहे. ते म्हणतात की, मूळ निराकार असलेल्या ब्रह्मामध्ये अहंकाराचे स्ुरण झाल्यामुळे या विश्वाला हे बाह्य स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामध्ये चाैऱ्याएेंशी हजार याेजनांची पृथ्वी पाण्याने वेढलेली असून मध्ये सहस्र याेजनांचा विस्तार असलेला मेरू पर्वत आहे.त्या मेरूपर्वतावर ब्रह्मदेवाचा पाषाणाचा सत्यलाेक, विष्णूंचे पाचूचे वैकुंठ आणि शंकराचे स्फटिकाचे हिमाच्छादित कैलास आहे. त्याच्या खाली इंद्राचा स्वर्गलाेक आहे. स्वर्गामध्ये देव, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा राहतात. अमृतभाेजने, नृत्यगायन आणि सदैव तारुण्य यांनी स्वर्गलाेक भरलेला आहे.
 
तेथे दु:ख नावालाही नाही. असा हा स्वर्गलाेकीचा अलाैकिक महिमा वर्णन करून ते मुख्य विषयाकडे म्हणजे मुक्तिमार्गाकडे वळतात. एखादा लाेकप्रिय वक्ता जसे श्राेत्यांना रंगवत नेऊन मूळ विषयाला नंतर हात घालताे तसाच हा प्रकार आहे.ज्या देवाची भक्ती करावी, त्याच्या स्थानात स्थान मिळणे विष्णुभक्तीमुळे वैकुंठ मिळणे ही सलाेकता मुक्ती झाली. मुक्तीचा समीपता हा दुसरा प्रकार म्हणजे जन्ममरणातून मुक्त हाेऊन देवाच्या समीप म्हणजे जवळ तुळशीमाळ, अलंकार वगैरे स्वरूपात स्थान मिळणे आणि तिसरा प्रकार म्हणजे सगुण भक्तीचा शेवट परमेश्वराचे रूप प्राप्त हाेऊन त्याच्या चरणाशी ठाव मिळणे ही स्वरुपता मुक्ती झाली. याप्रमाणे पहिल्या तिन्ही मुक्तींचे वर्णन करून श्रीसमर्थ या तिन्हींपेक्षा चाैथी सायुज्यमुक्ती सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगून नंतर तिचे निरुपण करतात! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0