सकारात्मक व नकारात्मक असे दाेन प्रकारचे विचार आपण पाहताे. कांही लाेक सकारात्मक विचारांचे, तर कांही नकारात्मक विचाराचे असतात. याचबराेबर कांही लाेक या दाेन्ही विचारांचे असतात. नकारात्मक विचाराचा माणूस कितीही व कांहीही चांगले समाेर आले तरी त्यात त्रुटी, उणीव, दाेष काढल्याशिवाय किंवा कांहीतरी नांव ठेवल्याशिवाय राहत नाही.सकारात्मक विचाराचा माणूस काय कमी आहे, याचा शाेध न घेता काय उपलब्ध आहे याकडे पाहताे. सकारात्मक व नकारात्मकविचारांना एकत्र जाेपासणारा माणूस त्याच्या इच्छेप्रमाणे व प्रसंग पाहून एखाद्या बाजूवर जाेर देताे.एकाच प्रसंगाकडे दाेन लाेक वेगवेगळ्या विचारातून कसे पाहतात याचा मला एक प्रसंग आठवताे.
आम्ही एका लग्न समारंभला गेलाे हाेताे. मुख्य प्रवेशद्वारातून एक महिला येत हाेती, जी दिसायला सुंदर हाेती व खराेखरच वस्त्र, अलंकारही उत्कृष्टपणे परिधान केली हाेती.त्या महिलेकडे पाहून आमच्या समाेरील एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणाली, अगं किती छान दिसते ती! त्यावर दुसरी पटकन म्हणाली, तुला काय माहिती आहे तिचं, तिच्या नवऱ्यानं लाेकांना लुबाडून तिला दागिने केलेत.खरं म्हणजे दागिने, कपडे काेणी काेठून व कसे आणले याचा त्या स्त्रीच्या साैंदर्याशी काय संबंध? असाे, असे विचार आपल्याकडे नकाेत. असे विचार आपणालाही कालांतराने का हाेईना दुःख दिल्याशिवाय राहत नाहीत.म्हणून आपण चांगलेच विचार जाेपासले पाहिजेत. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448