ओशाे - गीता-दर्शन

13 Feb 2023 14:33:52
 
 

Osho 
याचा शेवट तर कधीही हाेणार नाहीये...आधी जसं अज्ञान हाेत तसंच ते कायम राहील. ही सगळी उत्तरं अज्ञानातूनच दिली गेलेली उत्तरं आहेत. उत्तरं तर कुठल्याच प्रश्नांची मिळणार नाहीत, यातून सुटणार तर काेणताच प्रश्न नाही, पण उलट आणखी माेठी प्रश्नावळ उभी राहील जग कुणी बनवलं- ईश्वरानं. हे उत्तर अज्ञानानेच दिलं गेलंलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अज्ञानीच विचारीत आहेत अन् अज्ञानीच उत्तर देताहेत.उत्तर आणि प्रश्न यांनी जगाचे काेडे सुटणार नाहीये. ते म्हणतात की, जसा कुंभार घडा घडवताे तसाच देवाने हा संसार बनवला. देवालाही कुंभाराची उपमा देऊन टाकतात. त्यालाही कुंभार बनवून टाकलं. बिन कुंभाराचा घडा कसा बनेल? तसा बिनदेवाचा संसार कसा बनेल? ताे तर महाकुंभार आहे.
 
त्याने घड्यासारखं हे जग बनवलं. पण एखादं पाेट्टं न्नकीच विचारेल की, ‘ते ठीक आहे हाे, समजलं की त्याने जग बनवलं पण त्याला काेणी बनवलं ते सांगा.’ मग जे जरा धैर्यवान आहेत ते आणखी काही उत्तर शाेधायला लागतील. अन् ज्यांच्याकडे अशा धैर्याची उणीव आहे ते साेटा उगारतील अन् म्हणतील, ‘हे म्हणजे फारच झालं. हा प्रश्न अती झाला. आता आणखी पुढे विचारू नका. नाहीतर बघितली का ही काठी! डाेकं फुटेल.’ जर हा अतिप्रश्न म्हणायचा हाेता तर त्या आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना थांबायला पाहिजे हाेतं की- ‘व्यर्थ प्रश्न विचारू नका म्हणून!’ कारण फरक काय पडला? गाेष्ट तर जिथेच्या तिथेच ठप्प उभी आहे. रहस्य जिथेच्या तिथेच आहे. आधी प्रश्न फ्नत जगाबद्दल हाेता, काेणी बनवलं? आता ताे देवाबद्दल आहे-काेणी बनवला? ताे अंतिम, अल्टिमेट गाेष्टीशी संबंधित आहे.
 
Powered By Sangraha 9.0