अर्जुनाच्या प्रश्नास अनुसरून भगवंतांनी आणखी बऱ्याच विभूती त्याला सांगितल्या. सर्पांच्या कुळांत वासुकी नावाचा सर्प मीच आहे. सर्व नागांतील अनंत नावाचा नाग ही माझी विभूती आहे. अरे अर्जुना, पश्चिम दिशारूप तरुण स्त्रीचा स्वामी जाे वरुण ताे मीच आहे. सर्व पितरांत अर्यमा नावाची पितृदेवता मी आहे.सर्व निग्रहांचा निग्रह करणारा यमधर्म मीच आहे.अरे राक्षसांच्या कुळातील दैत्य जाे प्रल्हाद ताे मीच आहे. ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ हा मी आहे. हिंस्र पशूंत सिंह ही माझी विभूती आहे. सर्व पक्ष्यांत मी गरुड आहे. अत्यंत वेगवान असणारा वारा ही माझी विभूती आहे. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीरामचंद्र मीआहे. जलचरांमध्ये मकर मी आहे. जलप्रवाहांमध्ये गंगा मी आहे.
तीनही लाेकांतील प्रसिद्ध अशी जान्हवी नदी मीच आहे.अशा वेगवेगळ्या विभूतींची नावे घेऊ लागलाे तर अर्धे आयुष्यदेखील पुरणार नाही. नक्षत्रांची नाेंद कशी घ्यावयाची? पृथ्वीच्या परमाणूंची माेजदाद कशी करावयाची? तसेच माझ्या आणखी विभूती किती सांगाव्यात? मूळ झाडच उपटून घेतले की, त्याच्या ांद्या, पाने, ुले हाती येतात. त्याचप्रमाणे दाेषरहित व मूळस्वरूप अशा मलाच जाणून घ्यावे.नाहीतर वेगवेगळ्या विभूती किती ऐकाव्यात? अर्जुना, सार हे की, सर्व मीच आहे. आपल्या विभूतीपैकी रामचंद्रांचे महत्त्व श्रीकृष्णांनी विस्ताराने वर्णन केले आहे. त्यांनी धर्माचा उद्धार केला. ताे सूर्यवंशातील दुसरा सूर्यच म्हणावा लागेल.