गीतेच्या गाभाऱ्यात

11 Feb 2023 15:03:21
 
 
पत्र तिसरे
 

Bhagvatgita 
 
या दृष्टीने आपले तत्त्वज्ञान म्हणते कीजग बदलणारे असल्यामुळे ते मिथ्या आहे व जगाच्या बुडाशी असणारे ब्रह्म न बदलणारे असल्यामुळे ते सत्य आहे.एखादी नवीन लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यास प्रेमाने म्हणते - ‘‘अरे लबाडा।’’ माता आपल्या तान्ह्या मुलाचे पापे घेऊन काैतुकाने म्हणते- ‘‘अरे लबाडा।’’ कृष्ण कन्हैया गाेपींना प्रिय हाेता. त्या प्रेमभराने त्याला म्हणत- ‘‘अरे लबाडा।’’ मिथ्या शब्द असाच लबाड आहे. तू लबाडी समजून घे म्हणजे तुला माैज वाटेल.पुढचा प्रश्न तू गीतारहस्य व ज्ञानेश्वरी यासंबंधाने विचारला आहेस.काेहिनूर हिऱ्याची अशी गाेष्ट सांगतात की ताे हिंदुस्थानातून इंग्लंडमध्ये नेल्यावर तेथे त्याला नवे पैलू पाडण्यात आले व त्यामुळे ताे अधिक तेजस्वी दिसू लागला. हिऱ्यास लागू पडणारा हा न्याय गीता ग्रंथास लागू पडताे.
 
गीताग्रंथाला पुष्कळांनी पैलू पाडले आहेत त्यामुळे ताे अधिकाधिक तेजस्वी हाेत आहे. लाेकमान्य टिळकांनी पैलू पाडण्याचे जे काम केले ते फारच अभिनंदनीय आहे.तू एक लक्षात ठेव कीगीतेमध्ये ज्ञान, कर्म व भ्नती यांचा सुंदर समन्वय आहे.लाेकमान्यांनी गीतेचे तात्पर्य कर्मयाेगपर काढले असले तरी सखाेल अभ्यास केला म्हणजे तुला कळून येईल की गीतारहस्याकर्मयाेगाच्या पाठीमागे टिळकांनी दाेन विशेषणे लावली आहेत.ते म्हणतात कीज्ञानमूलक भ्नितप्रधान कर्मयाेग हे गीतेचे तात्पर्य आहे.या तात्पर्यात ज्ञान, कर्म व भ्नती यांचा समन्वय असून भ्नती प्रधान आहे. गीतारहस्यात लाेकमान्यांनी पाैर्वात्य व पाश्चात्य खूप खूप आधार दिले आहेत. एक गाेष्ट मात्र खटकते की त्यांनी ज्ञानेश्वरीतील जरूर ते आधार दिले नाहीत.
 
ज्ञानेश्वरीमध्ये भ्नितमार्गाचे पराकाष्ठेचे उत्कृष्ट विवेचन आहे.मराठी साधुसंतांमध्ये ज्ञानेश्वरांचा पहिला नंबर आहे. ज्ञानेश्वर विद्वानांमध्ये विद्वान, तत्त्वज्ञानांमध्ये तत्त्वज्ञ व कवींमध्ये कवी आहेत.लाेकमान्यांनी गीतारहस्यात भ्नितमार्ग हे फार उत्तम प्रकरण लिहिले आहे. त्यात ते शेवटी म्हणतातश्रीमद्भगवद्गीतारूपी सुवर्णपात्रातील भ्नती हा शेवटचा गाेड घास हाेय. प्रेमाचा हा घास घेतला, आता आपाेष्णी घेऊन उठण्याच्या तयारीस लागू.हे प्रकरण फार गाेड आहे. यात लाेकमान्यांनी खूप आधार दिले आहेत.विषयी लाेक श्रवणा येती। ते बायकांकडेच पहाती। चाेरटे लाेक चाेरुन जाती। पादरक्षा।। हे समर्थांचे उद्गार या प्रकरणात आहेत. तुला आश्चर्य वाटेल की- भ्नितमार्ग या एकाच प्रकरणात लाेकमान्यांनी तुकारामांचे चाैदा आधार दिले आहेत, पण ज्ञानेश्वराचा एकही आधार नाही.
Powered By Sangraha 9.0