जेव्हा एखादी व्य्नती हे रहस्य समजून घेते की, काेणत्याही प्रश्नाचं कुठलही अंतिम उत्तर नसतं, तेव्हा ती व्य्नती प्रश्नच साेडून देते.
त्या प्रश्न गळून पडण्याच्या स्थितीचं नाव ‘ज्ञानविज्ञानाने तृप्त हाेणे’ असे आहे. ती व्य्नती प्राैढ हाेते. त्या व्य्नतीला आता काहीही कुतूहल नसते. आता रस्त्याने जाताना काहीही विचारायची गरज तिला पडत नसते. कारण तिला हे माहीत असतं की, विचारून विचारूनसुद्धा काहीच मिळत नसते.आणि सर्वच उत्तरं केवळ नव्या प्रश्नांना जन्म देणारीच सिद्ध हाेतात. ‘मी काेण आहे?’ हेही ती व्य्नती विचारीत नाही. आणि तू काेण आहेस?, हेही विचारीत नाही. तिनं आता विचारायचंच बंद केलेलं असतं. जेव्हा विचारणं थांबतं, तेव्हा काय हाेतं? तेव्हा काेणती घटना घडते ? जेव्हा चित्त काेणताही प्रश्न विचारीत नाही तेव्हा माेठं रहस्य असतं.
जेव्हा चित्तात काेणताही प्रश्न नसताे, सगळे प्रश्न जेव्हा गळून पडतात, तेव्हा चित्त इतकं माैन हाेऊन जातं, इतकं शांत हाेऊन जातं की, ते दुसऱ्या काेणत्यातरी मार्गानं जीवनाच्या रहस्याशी एकरूप हाेऊन जातं. तिथं उत्तर मिळत नसतं, पण जीवन मिळतं. उत्तर मिळत नसतं पण अस्तित्त्व मिळतं. हेच उत्तर आहे. रहस्याशी एकजीव, आत्मसात हाेऊन जाणे.प्रश्न विचारून जाणण्याची एक शैली आहे.अन् न विचारता जाणण्याची ही आणखी एक शैली आहे. न विचारता जाणण्याची शैली ही धर्माची शैली आहे. विचारून जाणण्याची शैली ही विज्ञानाची शैली आहे.पण कृष्ण म्हणताे की ज्ञानविज्ञान या दाेहाेंनी जाे तृप्त झाला, ताे प्राैढ झाला. मॅच्युअर झाला.
ताे आतां विचारीतच नाही.