इंद्रियांमाजीं करावें। मन तें मी हेें जाणावें। भूतांमाजीं स्वभावें। चेतना ते मी ।। 10.224

10 Feb 2023 16:02:29
 
 

Dyaneshwari 
 
अर्जुनाच्या प्रेमळ आग्रहामुळे भगवंत आपल्या विभूती विस्ताराने सांगत आहेत. ते म्हणतात की, अर्जुना, सर्व भूतांच्याअंत:करणातील आत्मा मी आहे.बारा आदित्यांतील विष्णू नावाची देवता मी आहे. तेजस्वी पदार्थांमध्ये सूर्य मी आहे.एकाेणपन्नास (49) मरुद्गणांत मरीची मी आहे.आकाशरूपी रंगणातील नक्षत्रांमध्ये चंद्र ही माझी विभूती आहे.चारही वेदांत सामवेद मी आहे. मरुद्गणांचा भाऊ महेंद्र मीच आहे. इंद्रियांमध्ये अकरावे असणारे मन ही माझीच विभूती आहे. सर्व प्राण्यांत असणारी स्वाभाविक बुद्धी म्हणजे माझीच विभूती आहे. याच प्रकाराने भगवंत अर्जुनाला आणखी विभूती सांगतात.सर्व रुद्रांत कामाचा शत्रू जाे शंकर ताे मी आहे.
 
यक्षराक्षसांमधील कुबेर मीच आहे. आठ वसूंमधील अग्नी ही माझी विभूती आहे. सर्व उंच पर्वतांमध्ये मेरूपर्वत मीच आहे. पुराेहितांतील मुख्य जाे बृहस्पती ताे मीच आहे. सेनानायकांमध्ये कार्तिकेय मी आहे.जलाशयांत सागर मी आहे. महर्षींमध्ये भृगू मी आहे.चतुर्विध वाणींत एकाक्षर ॐ आणि सर्व यज्ञांतील जपयज्ञ मी आहे. स्थावर पदार्थांत हिमालय तसेच सर्व श्रेष्ठ वृक्षांत अश्वत्थ म्हणजे पिंपळ मी आहे. अर्जुना, देवर्षींमध्ये नारद तर गंधर्वांंमध्ये चित्ररथ मी आहे. सर्व सिद्धांत कपिलाचार्य मी आहे. सर्व अश्वांत उच्चैश्रवा मी आहे. सर्व हत्तींत ऐरावत मी आहे. सर्व माणसांतील राजा मी आहे. सर्व शस्त्रांतील वज्र ही माझी विभूती आहे. सर्व गायींत मी कामधेनू आहे. सर्व उत्पादकांत मदन मीच आहे.
Powered By Sangraha 9.0