महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे प्रयत्न : गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

28 Dec 2023 15:20:40
 
w
 
 
मुंबई, 27 डिसेंबर (आ.प्र.) :
 
ग्रामीण भागातील स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून 25 कोटींपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करत 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. वांद्य्रातील (पूर्व) एमएमआरडीए मैदानावर ‌‘महालक्ष्मी सरस' या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना महाजन बोलत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक रेमंड डिसोजा, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. पी. पाटील, उपायुक्त कोकण विभाग गिरीश भालेराव, ग्रामविकास विभागातील अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्या यावेळी उपस्थित होत्या. राज्यातील सहा लाख बचत गटांना 2022-23 मध्ये सहा हजार कोटींचे कर्ज मिळाले होते. यात वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्जवितरण पुरवठा 7 हजार कोटींवर गेला आहे.
Powered By Sangraha 9.0