गीतेच्या गाभाऱ्यात

28 Dec 2023 16:25:25
 
 
पत्र आठवे
 
 
bhagvatgita
ते काम करताना मिळणारा आनंद हाच तुझा माेबदला.काही लाेक जरी तुझ्या कामाबद्दल हसले तरी ‘ना खंत ना खेद’ ही भावना ठेव.तुला त्या खारीची गाेष्ट ऐकून माहीत असेल. रामाने समुद्रावर सेतू बांधण्यास प्रारंभ केला तेव्हा एक खार वाळूत लाेळून पुलाजवळ येत असे व अंग झाडून वाळू टाकून आपल्या कुवतीप्रमाणे सेतू बांधण्याच्या कामात हातभार लावत हाेती.वानरसेनेतील वानर तिला हसत हाेते कारण ते माेठमाेठे पर्वत, झाडेच्या झाडे व वाळूचे ढीगच्या ढीग पुलाखाली उचलून आणीत हाेते.वानर हसत हाेते, तरी ती खार आनंदाने बेहाेश हाेऊन रामाच्या कार्याला हातभार लावीत हाेती.रामाला त्या वानरांच्यापेक्षा देखील खारीचे काैतुक वाटले.त्यांनी तिला वंदन केले व तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला.
 
तू म्हणतेस की चांगले काम करताना केव्हा केव्हा अपयश येते, त्यामुळे आपण निराश हाेताे. गीता वाचून तुला कळेल की, चांगले काम करताना अपयश आले तरी निराश हाेण्याचे कारण नाही. अपयशामुळे तू नाउमेद हाेऊ नकाेस. तू आपल्या डायरीत लिहून ठेव की, अपयश जीवनाचे साैंदर्य आहे. अपयश नसेल तर जीवनातील काव्यच नष्ट हाेऊन जाईल.जीवनाचा प्रवास करत असताना केव्हा तुझा धीर खचताे.या बाबतीत तू एक नितांत मार्मिक गाेष्ट लक्षात घे.एकदा स्वामी विवेकानंद व त्यांच्या बराेबरचे संन्यासी हिमालयातून प्रवास करत हाेते. रस्ता लांबच लांब चढणीचा हाेता. रस्ता तुडवत असताना एक संन्याशी वर पाहून म्हणाला, ‘‘मी आता थकलाे, माझा धीर खचला.
 
हा रस्ता किती उंच आहे; हा कसा काटू शकेन?’’ स्वामी विवेकानंद त्याला म्हणाले, ‘‘तुमच्या खालचा रस्ता पहा. केवढा लांबच्या लांब रस्ता आहे. पण ताे सारा रस्ता तुम्हीच काटला आहे. हा रस्ता तुम्ही जसा काटला तसाच वरचा रस्ता देखील काटू शकाल.’’ विवेकानंदाचे शब्द ऐकून त्या संन्याशाला धीर आला आणि आनंदाने ताे रस्ता चढू लागला.तू म्हणतेस की, संकटे आली की आपण डगमगताे. गीता वाचून तुला कळेल, की माणसाने संकटाला धैर्याने ताेंड दिले म्हणजे ती संकटे पळून जातात.एकदा स्वामी विवेकानंद बनारसमध्ये एकीकडे पाण्याचा माेठा तलाव व दुसरीकडे उंच भिंत यामधून चालले हाेते.वाटेत अनेक माकडे हाेती. ती त्यांच्यावर ओरडू लागली. दात विचकू लागली.
 
विवेकानंद भिऊन पळू लागले. विवेकानंद जसे जाेरात पळू लागले, तशी ती माकडेदेखील त्यांना चावण्यासाठी त्यांच्यामागून धावू लागली. विवेकानंद घामाघूम झाले, इत्नयात एक मनुष्य त्यांना म्हणाला, ‘‘पळू नका, माकडांना ताेंड द्या.’’ विवेकानंद एकदम वळले आणि माकडाकडे ताेंड करून उभे राहिले. आणि काय आश्चर्य! माकडे मागे सरली व पळून गेली.या प्रसंगावरून विवेकानंदांनीलिहून ठेवले आहे की संकटे माकडांप्रमाणे असतात. त्यांना धैर्याने ताेंड द्या म्हणजे ती पळून जातील.मतांध माणसाबद्दल तू विचारले आहेस. या बाबतीत तू असे लक्षात घे. की, वाळूचे कण रगडून तेल गाळता येईल किंवा मगरीच्याताेंडातून आपल्याला इजा न हाेता हात काढता येईल पण मतांध माणसाचे मत तुम्हाला बदलता येणार नाही.देण्या-घेण्यासंबंधी तू प्रश्न विचारला आहेस. देता येण्यासाठी तू घेत जा. सूर्य सागरापासून पाणी घेताे व पर्जन्यरूपाने परत देताे.
Powered By Sangraha 9.0