गीतेच्या गाभाऱ्यात

25 Dec 2023 18:01:35
 
 
पत्र सातवे
 
bhagvatgita
तुझा पुढचा प्रश्न असा आहे की, एखाद्या मनुष्याला खूप सुखे मिळत असतात. लाेकांनी हेवा करावा इतकी सुखे त्याला मिळत असतात. असे असून देखील त्या मनुष्याच्या बाबतीत सुखाचा पूर्णांक का हाेत नाही? याचे उत्तर असे आहे की, सुखाचा उपभाेग अंशस्थानी असताे आणि सुखाची अपेक्षा छेदस्थानी असते.सुखाचा उपभाेग सुखाची अपेक्षा यामध्ये सुखाची अपेक्षा सुखाच्या उपभाेगापेक्षा माेठी असल्यामुळे अथवा अंशापेक्षा छेद माेठा असल्यामुळे गणितात ताे अपूर्णांकच राहणार.साधुसंतांना सुखाची अपेक्षा कमी असल्यामुळे व आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सुखे देवाने दिली आहेत, अशी त्यांची भावना असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पूर्णांक हाेणे श्नय असते. संपत्ती आणि विपत्ती या बाबतीत तुझा जाे प्रश्न आहे, त्याचे थाेड्नयात उत्तर असे की, अंतरंगातील दिव्य श्नतीची स्मृती हीच खरी संपत्ती आणि अंतरंगातील दिव्य श्नतीची विस्मृती हीच खरी विपत्ती!
 
तुझ्या पुढील प्रश्नाचे उत्तर असे की, ‘‘आपल्या अंगावर पाणी पडल्यावर ज्याप्रमाणे कबुतर पंखांनी पाणी उडवून लावते त्याप्रमाणे दु:खाचे पाणी तत्त्वज्ञानाच्या पंखांनी उडवून लावावे.’’ तू आपल्या डायरीत टिपून ठेव की, ‘‘जाेपर्यंत अहंकार आहे, ताेपर्यंत तत्त्वज्ञान अंगी बाणत नाही.’’ ज्ञानी माणसाला पुष्कळदा अहंकार येताे. भ्नितप्रेम अंगी बाणले म्हणजे मात्र अहंकार निघून जाताे. म्हणूनच असे वाटू लागते की, प्रेमाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे.माझ्या लहानपणची एक नितांत मार्मिक गाेष्ट आहसांगलीला मुरलीधराच्या देवळात एक विद्वान शास्त्री राेज सकाळी गीतेवर प्रवचन देत असत शास्त्रीबुवा पराकाष्ठेचे ज्ञानी हाेते. सारे शांकरभाष्य त्यांना मुखाेद्गत हाेते. त्यांचे प्रवचन ऐकताना असे वाटायचे की, ज्ञान त्यांच्या घरी पाणी भरते आहे.त्याचवेळी सांगलीला ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर आले हाेते. त्यांचे नगर वाचनालयाच्या पटांगणात संध्याकाळच्या सुमारास व्याख्यान ठरले हाेते.
 
शास्त्रीबुवांचे सकाळी प्रवचन झाल्यावर काही लाेक त्यांना म्हणाले की, आपण आज संध्याकाळी पांगारकरांच्या व्याख्यानाला जाऊ.
त्या दिवशी त्या लाेकांच्या बराेबर शास्त्रीबुवा व्याख्यानाला गेले. पांगारकरांचे व्याख्यान सर्वाेंत्कृष्ट झाले. भ्नितप्रेमाने न्हाऊन निघालेले पांगारकर इतके रसाळ बाेलले की लाेक अगदी संतुष्ट झाले.दुसरे दिवशी सकाळी शास्त्रीबुवा आपल्या प्रवचनात म्हणाले, ‘‘काल मी संध्याकाळी पांगारकरांच्या व्याख्यानाला गेलाे, पण खरे सांगायचे म्हणजे माझा ताे तास फुकट गेला.उगीच मी गेलाे असे मला वाटू लागले.’’ शास्त्रीबुवांचे म्हणणे लाेकांना आवडले नाही. एक श्राेता लगेच उभा राहीला आणि म्हणाला, ‘‘कालचे पांगारकरांचे व्याख्यान सर्वाेत्कृष्ट झाले असताना आपण असे कसे म्हणता?’’ लगेच शास्त्रीबुवा संतापून म्हणाले, ‘‘खाली बसा, तुम्हाला काहीच कळत नाही. मी इतका ज्ञानी आहे की, माझा हात धरणारा काेणी नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आता या ठिकाणी आला आणि त्याने मला विचारले की, तुला काय शंका आहे, तर मी सांगेन की, मला काही शंका नाही, तू आलास तसा चालता हाे.’’
Powered By Sangraha 9.0