टीका थांबली किंवा राेखण्यात आली तर संवादच संपुष्टात येईल. तसे झाले तर विवाहदेखील संपुष्टात येतील आणि विभक्त हाेण्याचा किंवा एकटे राहण्याचा कल वाढेल. मुख्य म्हणजे आपणही अनेकदा इतरांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका करत असताे. कारण टीका करण्यामध्ये अनेकदा छुपा स्वार्थ दडलेला असताे.त्यामुळे कुणावरही टीका करण्यापूर्वी आपल्यावर टीका झाली तर ती कशी हाताळायची याचे भान आपल्याला असणे गरजेचे असते.
जगात कुणीही परिपूर्ण नाही
टीकेला सामाेरे जाण्यासाठी हा सगळ्यात आगळा उपाय आहे. कुणीच परेक्ट असत नाही. प्रत्येक व्यक्तीने सुधारण्याची आणि आणखी सुधारण्याची गरज असते.त्यामुळे तुम्ही आधी सुधारावे, अशी कुणाची अपेक्षा असेल तर खुश व्हा आणि स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या तयारीला लागा. मग आपल्या हातून कधीची चूक हाेऊ शकत नाही, अशा गैरसमजात राहण्याची तुम्हांला गरज भासत नाही. प्रत्येक व्यक्तीम ध्ये काही त्रुटी असतात. जर तुमच्यामधील त्रुटी तुमच्या लक्षात येत नसतील तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अंर्तबाह्य विश्लेषण करत नाही.
तुमच्याविषयी विश्वास वाटला पाहिजे टीका करणाऱ्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विश्वास असला पाहिजे. तुम्ही त्याच्या हिताचेच सांगणार अशी खात्री त्याला असली पाहिजे. टीका करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या चांगल्या कामाची स्तुती करा. कधीही असे म्हणू नका की, ते सगळे तुझे चांगले आहे, पण...त्याऐवजी तुझ्या या गाेष्टी चांगल्या आहेत, असे म्हणा. कटू बाेल स्वीकारण्याची त्याची मानसिक तयारी झाल्यावर तुमचे म्हणणे साैम्य शब्दांत सांगा.
टीका करून नाराज करू नका
म्हणजे आज संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी तू अमका ड्रेस घालू नकाेस, असे म्हणण्यातून काहीही बदल हाेत नाही उलट समाेरची व्यक्ती नाराज हाेते.
वेळ व परिस्थितीचे भान कुणालाही दुसऱ्यांसमाेर कुणी टीका केलेली आवडत नाही. त्यामुळे शक्यताे एकांतात दुसऱ्याला समजावून सांगा. टीका करताना तुमचा मूड कसा आहे हे महत्त्वाचे असते. दुसऱ्यावर टीका करण्याच्यावेळी तुमचा मूड शांत आणि विचारी असला पाहिजे.याेग्य शब्दछटांची निवड अनेकदा आपण दुसऱ्याला चांगल्या गाेष्टी सांगत आहाेत असा आपला समज असताे आणि त्याचवेळी दुसऱ्याला त्या समजत नसल्याचा गैरसमज आपण करून घेताे. त्यामुळे एकच गाेष्ट आपण पुन्हा पुन्हा सांगत राहताे.आधीच वैतागलेली ती व्यक्ती त्यामुळे आणखी त्रासते. त्यामुळे तुमचे म्हणणे थाेडक्यात, अतिशय कमी वाक्यांमध्ये आणि नेमकेपणाने सांगा. हे सगळे सांगताना तुमच्या बाेलण्यात साैम्यता आणि तुमचे वागणे बाेलणे स्थिर असले पाहिजे. हातवारे, चढलेला आवाज यामुळे काहीही साध्य हाेत नाही.
\