फिनलँड संसदीय शिष्टमंडळाकडून विधिमंडळ कामकाजाची पाहणी

29 Nov 2023 00:33:08
 
 
 

finland 
राज्य सरकार हवामान बदलावरील कृतिआराखड्यावर काम करत आहे.त्यासाठी महत्त्वाकांक्षी धाेरणे विकसित केली जात आहेत. तसेच राज्यासाठी हवामान सुरक्षित भविष्य निश्चित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.
नीलम गाेऱ्हे यांनी सांगितले.महाराष्ट्र विधिमंडळ आणि फिनलँड संसदीय शिष्टमंडळ समितीची पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भात विधान भवनात बैठक झाली. फिनलँड संसदीय शिष्टमंडळाच्या प्रमुख जेनी पिटकाे, इव्हलिना हेनीलूमा, सदस्य मार्काे एसेल, नुरा फेजस्ट्राम, पेट्री हुरू, मे. केविला, हॅना काेसाेनेन, मिकाे ओलिकेनेन, मिकाे पाेल्व्हिनेन, मार्जा इक्राेस यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक वि. माे. माेटघरे, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विकास सूर्यवंशी,पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बाेबडे, राज्य वातावरणीय बदल कृतीसेलचे संचालक अभिजित घाेरपडे आदी उपस्थित हाेते.उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्याेग विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने राज्यातील पर्यावरणाबाबत केलेल्या उपाययाेजना आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करूनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट कसे साध्य करू शकताे, याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0