आई झालेल्या पत्नीला पतीने समजून घ्याव

29 Nov 2023 00:39:38
 

father 
 
एक प्रदीर्घकाळ विशिष्ट स्थितीतून बाहेर पडलेली स्त्री प्रसूतीनंतर तन-मनाने थकलेली असते. आपल्यात हाेणाऱ्या बाळाच्या हालचालींमुळे अनेक स्त्रिया त्रस्त व उदास राहत असतात. परंतु जसजसे शारीरिक स्वास्थ्य सुधारत जाते तसतसे त्यांचे मनही उभारी धरू लागते. पण बहुतेक पुरुष पत्नीची ही मानसिक अवस्था समजूनच घेत नसतात. आताही ते पत्नीकडून पूर्ण वेळ व लक्षाची अपेक्षा करीत असतात. पण आता पत्नीलाच पतीकडून शारीरिक व नैतिक मदतीची अपेक्षा असते.अशा वेळी जे पती मुलाला सांभाळणे ही पत्नीची जबाबदारी मानून हात झटकून माेकळे हाेतात ते पत्नीचा त्रास अधिकच वाढवतात. त्यांची मदत न मिळाल्यामुळेपत्नीचा सारा वेळ घरकाम आणि बाळाला सांभाळण्यातच जात असताे. त्यामुळे पतीला वाटते की, पत्नी फ्नत बाळाकडेच लक्ष देत आहे व त्याला विनाकारण टाळते आहे.
 
आपली असमर्थता दर्शविण्यासाठी ताे स्वतःला स्वतःतच गुरफटून ठेवताे.पत्नीच्या शंका अधिकच वाढतात. तिला वाटते की, पती स्वतःतच हरवलेला राहताे व आपल्यावर प्रेमच करीत नाही असे एक दुष्टचक्र सुरू हाेते. हे टाळण्यासाठी बाळ घरात येताच पतीने काही जबाबदाऱ्या स्वतः वर घ्यायला हव्यात. एकतर त्याने बाळाला सांभाळावे वा पत्नी बाळाला सांभाळत असेल तर घरकामात मदत करायला हवी.ही कामे करता करता काही वेळ दाेघांनी एकत्र घालवायला हवा.रात्री, पत्नीला विश्रांती देण्यासाठी पतीने बाळाला सांभाळावे. यामुळे बाळालाही वडिलांबद्दल जिव्हाळा वाटू लागेल.बाळाला कधीही आपल्या दांपत्यजीवनातील अडसर मानू नये व दाेघांनी मिळून बाळाचे संगाेपन करावे.
Powered By Sangraha 9.0