आर्किमिडीज म्हणत असे, ‘जाे आनंद त्या क्षणी झाला तसा पुन: कधी नाही झाला.जे रहस्य त्या दिवशी उलगडले, त्याचा आनंद पुन: कधीच नाही झाला.जे उत्तर मिळायचे हाेते ते मिळाले. त्याचे तितके महत्त्व नव्हते, पण रस्त्यावर नागड्यानेच पळत सुटणे युरेका, युरेका असे ओरडत, मला स्वत:ला माझाच पत्ता नव्हता.मी असा पळताेय याचाही मला काहीच ठावठिकाणा नव्हता. जेव्हा सडकेवर लाेकांनी विचारले, काय मिळाले? तेव्हा मला झट्नयात काही सांगता आले नाही. मला जे मिळाले ते काय मिळायचा प्रश्न हाेता? बस्स, फक्त मिळाले अंतरी एक धून बनून राहिली- मिळाले.’ ताे जाे मिळण्याचा क्षण आहे, कर्मठ व्यक्तीलाही ताे मिळताे, पण त्याला ते कर्मानेच मिळते. हाे अर्जुनासारखा माणूसच घ्या ना, जेव्हा तलवारी लकाकतील, अन् जेव्हा कर्माचा पूर्वक्षण असेल, तेव्हा असेल.
मी तलवार चालवताे, तेव्हा अर्जुन नाही उरायचा अन् शत्रूपण नाही उरायचा - फक्त कर्मच, असा भाव नाही असणार ताे! फक्त तलवार चालत आहे अशी स्थिती असेल. असा क्षण येताच अर्जुनासारखा माणूस समाधी या अनुभवाला पाेहाेचेल.अशा खास तीन प्रकारचे लाेक असतात.तसे पाहू गेल्यास, या प्रकारांचे आणखी पाेट प्रकार पडतात.यांच्यासाठी याेगाने खूपच विधी बसवल्या आहेत. पण, या तीन विधींच्या मार्गाने साधारणत: काेणतीही व्यक्ती चेतनेच्या त्या स्थानी पाेहाेचू शकते जिथे केवळ ज्ञानच उरते, वा केवळ कर्मच उरते वा केवळ भावच उरताे.