गीतेच्या गाभाऱ्यात

31 Oct 2023 12:32:32
 
 
पत्र पस्तीसावे
 
bhagvatgita
‘तुकाेबांची जात काेणती याबद्दल विद्वानांनी जे म्हटले आहे व ज्याबद्दल खूप वादावादी केली आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हास सांगितली.’ नंतर मी एकदम भावनाविवश झालाे व म्हटले- ‘तुकाेबांची जात काेणती या वादाला किंमत देऊ नका.तुकाेबांचे शब्द हृदयात काेरून ठेवा- ‘तुका म्हणे नाही जातीसवे काम। ज्याचे मुखी नाम ताेचि धन्य।। अहाे, तुकाेबांची जात काेणतीहा प्रश्न मला विचारणेस नकाे हाेता.कशाला हा प्रश्न लाेकांनी मला आवर्जून विचारला? तुकाेबांना मी माता माऊली समजताे. माझी जी जात तीच माझ्या आईची जात..भावनातिरेकाने हे मी बाेलून गेलाे आणि कितीतरी लाेकांच्या डाेळ्यातून खराेखर पाणी आले.भावनावेग ओसरल्यावर मी सांगू लागलाे- ‘असला प्रश्न विचारणेस नकाे असला तरी प्रवचन सुरू हाेण्यापूर्वी काही लाेकांनी मलाआवर्जून सांगितले आहे की- ‘तुम्ही न्यायाधीश आहा. तुकाेबांची जात काेणती? याचा आज निकाल कराच.’ ठीक आहे. प्रश्न आवडाे वा नावडाे. न्यायाधीशाला पुढे आलेल्या प्रश्नाचा निकाल करावा लागताे.
 
ऐका निकाल.काेणी जिज्ञासू तुकाेबांच्याकडे गेला तर ते त्याला उपदेश करत व गीतेची पाेथी पाठ करण्यासाठी देत.भागवत धर्माचा आधारस्तंभ म्हणजे गीताग्रंथ. तुकाेबांचा अत्यंत आवडता ग्रंथ म्हणजे गीताग्रंथ. गीतेमध्ये माणसांच्या चार जाती सांगितल्या आहेत. सात्त्विक, राजस व तामस या तीन जाती सांगून झाल्यावर सात्त्विकपेक्षाही श्रेष्ठ अशी एक जात सांगण्यात आली आहे. ती जात म्हणजे ‘गुणातीत.’ रेल्वेमध्ये फर्स्ट्नलासपेक्षा देखील वरचा वर्ग काही गाड्यांमध्ये असताे. या वर्गाचे नाव ‘एअरकंडिशन्ड’ असते, रेल्वेमध्ये हे जे चार वर्ग असतात त्याचप्रमाणे माणसाच्या चार जाती असतात.सात्त्विकपेक्षादेखील वरचा जात म्हणजे ‘गुणातीत’ गीतेच्या चाैदाव्या अध्यायात सव्वीसाव्या श्लाेकात म्हटले आहे कीजाे कृष्णाची अव्यभिचारी भ्नतीने सेवा करताे ताे गुणातीत हाेताे व ब्रह्मभूतावस्था प्राप्त प्राप्त करून घेण्यास समर्थ हाेताे.
 
माणसाच्या ज्या चार जाती गीतेत सांगितल्या आहेत त्यापैकी गुणातीत जात हीच माझ्या तुकाेबांची जात आणि हाच माझा निकाल.’ प्रवचनात टाळ्या वाजवणेच्या नसतात. पण हा निकाल ऐकून काही लाेकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.तुकाेबा आपणाला विशेष जवळचे वाटतात याचे कारण असे की, लहानपणी ते आपल्याप्रमाणे सामान्य हाेते.ज्ञानेश्वरांनी पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अलाैकिक ग्रंथ लिहिला. नामदेवांच्या बराेबर लहानपणीच विठाेबा बाेलू लागला. एकनाथ लहानपणीच घर साेडून गुरूच्या शाेधार्थ निघून गेले. रामदास लहानपणीच लग्नमंडपातून पळून गेले. हे अपूर्व झाले. हल्लीच्या काळी काेणता वर लग्नमंडपातून पळून जाईल? असा चमत्कार हल्लीच्या काळी झालाच तर वर वधूसकट पळून जाईल. पण रामदास एकटे पळून गेले.ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास - हे लहानपणातच असामान्य वाटतात. पण तुकाेबा लहानपणी आपल्याप्रमाणेच सामान्य हाेते. ह्या सामान्यातूनच ते असामान्य झाले म्हणूनच आपणाला ते विशेष जवळचे वाटतात व वाटू लागते की-
Powered By Sangraha 9.0