संध्याकाळी तीन मिळायच्या, आम्हाला संध्याकाळी तीनच पाहिजेत.’ याेग म्हणताे हे मनच बदलून टाका.एखाद्या माणसात राग थाेडा जास्त असताे तर लाेभ थाेडा कमी असताे. दाेन्हीची बेरीज बराेबर सातच हाेते. या चारांची बेरीज सगळ्या माणसांमध्ये सारखीच असते. पण बेरीज करताेच काेण? ज्याला राग जास्त आहे ताे म्हणताे, मी रागापासून कसा सुटू? लाेभाची तितकीशी कटकट नाहीये रागाचीच आहे. राग कापून टाकला तर रागाच्या ज्या राेट्या आहेत त्यांची बेरीज आणखी कशाशी तरी हाेणार आहे हे त्याला कुठे ठाऊक आहे? राग असा एकट्याने नाही कापता यायचा, हे चाैघे बराेबरच राहतात.
अन् बराेबरच जातात. याेग म्हणताे वरवरची लढाई करू नका. मुळे कापा. मुळे कुठे आहेत ते बघा. शाेधा मुळाचे ठिकाण. राग हाही मूळ नाहीये, अन् अहंकार हाही मूळ नाहीये. मूळ कुठे आहे? याेग म्हणताे तुमच्या मनाची घडण हेच मूळ आहे. तुमच्या मनाची जी व्यवस्था आहे त्यातच मूळ आहे तर मनात लाेभ, राग असणारच.काम, अहंकार असणारच. तुमचे जे मन आहे त्याचा हा स्वभावच आहे. हे मनच बदलून टाका. या मनाच्या ठिकाणी नवे मन स्थापित करा. हे मन राहिले, याच मनाचे यंत्र राहिले तर सगळे आता आहे तसेच चालू राहील. हे यंत्र नवीन करून टाका. नव्या यंत्राची स्थापना करा.मग तुमच्याकडे नवे मन हाेईल.