काहींचा स्वभाव उपजतच अत्यंत चांगला असताे, तर काहींना आपला स्वभाव इतर चांगल्या लाेकांच्या सहवासाने, तसेच अनुभवातून चांगला बनवावा लागताे.चांगल्यांचा सहवास लाभणे बहुतांशवेळा दुर्मीळ असते. पण, चांगल्यांच्या कार्याची आठवण काढणे, त्यांच्या कार्याचा आदर्श जाेपासणे तसे अवघड नसते. चांगल्यांचा विचार करायला त्यांचा आदर्श आठवायला व त्याप्रमाणे वागायला मन आणि बुध्दीची साथ लागते. मन एकीकडे व बुध्दी दुसरीकडे धावत असेल, तर चांगुलपणा जाेपासणे अवघड जाते. चांगल्यांचा सहवास, चांगल्यांची आठवण मन:पूर्वक केली, तर बुध्दी आपाेआप साथ देऊ लागते. चांगल्यांचे अनुयायी व्हायला भाग्य लागते. आपण चांगल्यांचे अनुयायी आहाेत, त्यांच्या विचाराप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करताे आहाेत.
त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहाेत, असे म्हटले, तर असे का म्हणताेस म्हणून काेणी वेठीस धरत नाही. आपण समचरणी उभा राहून समता, बंधुता, नि:स्वार्थ प्रेम, कर्तव्याचा संदेश देणाऱ्या पांडुरंगाचा दास आहाेत असे म्हणताे.त्याचे दास्यत्व खराेखर पूर्णपणे आचरणात आणताे. त्यामुळे आपणाला काेणतेही विकार वेठीस धरत नाहीत, असे महाराज म्हणतात. महाराजांच्या अभंगाचे हे अर्थ आम्ही आमच्या अल्प बुध्दीला सुचेल तसे काढले असल्याने मूळ अर्थासाठी गाथा वाचणे आवश्यक आहे. महाराजांची गाथा हा अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448