अर्जुन व श्रीकृष्ण ह्यांच्यातील अलाैकिक प्रेम वर्णन करणारी ही आणखी एक ओवी आहे. मागच्या ओवीत, अमृताचे भाेजन पुरे आता, असे काेणी म्हणेल काय? असा प्रश्न अर्जुनाने केला हाेता. हा प्रश्न ऐकून त्याला ऐकण्याची गाेडी लागली आहे, असे देवांना वाटले व त्यांच्या चित्ताला ार संताेष झाला. त्या सुखाने भगवान डाेलू लागले. ते म्हणत हाेते, अर्जुना, वा! ार चांगले बाेललास. पण पुन्हा पुन्हा तीच तीच गाेष्ट सांगावी असा हा प्रसंग नाही. पण तुझी ऐकण्याची गाेडी मला बाेलावयास लावते.भगवंतांचे वरील बाेलणे ऐकून अर्जुन म्हणाला, ‘देवा, तुम्ही असे का म्हणता? चकाेर नसला तरी चंद्रप्रकाश असताेच ना? ताे चकाेराकरताच असताे असे नाही. जगाचा ताप नाहीसा करावा हा चंद्राचा स्वभाव आहे.
त्यानुसार ताे प्रकाशताे. अवचितपणे या चंद्रप्रकाशातील अमृतकण वेचण्याच्या इच्छेने चकाेर पक्षी चंद्राकडे ताेंड करून असताे एवढेच. पण देवा, आपण कृपासिंधू आहात.आम्ही चकाेराप्रमाणे केवळ निमित्तमात्र आहाेत. मेघ आपल्या औदार्याने सर्व जगाचे दु:ख दूर करताे. त्याच्या वर्षावाच्या मानाने चकाेराची तहान ती किती? या चकाेरास चाेचीने थेंब घेण्यासाठी मेघरूपाने वृष्टी हाेऊन वाहणाऱ्या गंगेलाच यावे लागते. याचप्रमाणे आमच्या इच्छेसाठी तुम्ही प्रकट व्हावे व आमच्याशी प्रेमाने बाेलावे.’ अर्जुनाचे हे बाेलणे ऐकून देव संतुष्ट झाले व म्हणाले, अर्जुना, आता तुझे हे बाेलणे पुरे कर. तुझी आस्था पाहून आम्हांस आनंद हाेताे हे खरे. पण आता आणखी वर ही स्तुती कशासाठी? तुझी ऐकण्याची आवड तीच माझ्या वक्तृत्वाशी साेयरीक जाेडते. तुझ्या लक्ष देऊन ऐकण्यामुळे मी बाेलता हाेताे.