गीतेच्या गाभाऱ्यात

09 Jan 2023 16:50:30
 
 
पत्र चाैतिसावे
 

Bhagvatgita 
 
रंगीबेरंगी नवरसांनी भरलेल्या मानव जीवनसागरावर आलेला पांढरा शुभ्र फेस म्हणजे देवप्राप्तीच्या मागे लागले असताना मिळणारा आनंद, साखरेत ज्याप्रमाणे गाेडी, रत्नात ज्या प्रमाणे तेज, अत्तरात ज्याप्रमाणे सुगंध त्याप्रमाणे अंतरंगातील दिव्य श्नतीच्या स्पर्शात परमानंद साठवलेला असताे. हा परमानंद म्हणजे मानवी जीवनात चमकणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य. हे इंद्रधनुष्य सुखाचे सुखत्व वाढवते व दु:खाचे देखील सुखात रूपांतर करते.समाजाची निष्काम सेवा हा जीवनाचा महामेवा असताे.स्व’ चा परम अर्थ म्हणजे परमार्थ. हा परमार्थ साधण्याकरता उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीताग्रंथ.तू आपल्या डायरीत लिहून ठेव आम्हा गीता से माता। जीवन मंदिरी आता।। तू असेही लक्षात घे कीकेवळ चमकणाऱ्या कल्पना म्हणजे साहित्य नव्हे.
 
चमकणाऱ्या कल्पना माणसांना दिसतात, विस्मित करतात, पण साहित्य म्हणजे दिवाळीचे दारूकाम नसून, साहित्य म्हणजे ज्यात हित आहे ते.अनेक सुखे व अनेक दु:खे जेव्हा चुरडावीत तेव्हा जीवनात ज्याला अर्थ आहे असा एखादा कण हाती लागताे.असे अनेक कण गाेळा करून त्यात साहित्याची साखर व भ्नितप्रेमाचे तूप घालून प्रसाद तयार करणेचा असताे व हाच प्रसाद गीतेच्या गाभाऱ्यांत लाेकांना भावाने, भ्नतीने, भावनेने वाटणेचा असताे.असाे. आता राहिलेल्या दाेन पत्रात राहिलेल्या शंकांचे निरसन करू पाहणारा.
तुझा राम पत्र पस्तिसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले.तुझ्या इच्छेप्रमाणे या पस्तीसाव्या पत्रात संत तुकारामांच्याबद्दल जरूर ती माहिती देत आहे. आणखी एक पत्र लिहून ही माला मी पुरी करणार आहे.
 
तुला त्याबद्दल वाईट वाटत आहे पणहवे हवे असे वाटत असेपर्यंतच पुरे करण्यात जीवनाचे माधुर्य साठवलेले असते.‘संतश्रेष्ठ तुकाराम’ अशा तऱ्हेची बिरुदावली न वापरता तुकाेबा हा प्रेमाचा, भावाचा, भावनेचा, आपलेपणाचा शब्द मुद्दाम मी वापरत आहे. घरातला प्रेमळ माणूस घराबाहेर ‘मान्यवर आबाराव’ ‘परमपूज्य आबासाहेब’ ‘देशभ्नतशिराेमणी आबामहाराज’ असा काहीसा बडा प्राणी असताे. पण घरात लाेक त्याला प्रेमाने, आपलेपणाने ‘आबा’ म्हणूनच हाक मारतात. त्याच आपलेपणाने मी तुकाेबा असे म्हणत आहे.‘तुकाेबा’ म्हटल्याबराेबर ज्यांच्या अभंगावाचून भजनास प्रारंभ हाेत नाही व ज्यांच्या अभंगावाचून कीर्तनाचा शेवट हाेत नाही अशी हातात वीणा घेऊन गळ्यात तुळशीमाळा घालून भ्नितरसाने थयथय नाचणारी प्रेमळ साेज्वळ निर्मळ मूर्ती आपल्या डाेळ्यापुढे उभी राहते व आपण म्हणू लागताे, शिव तेथे श्नती, सत्य तेथे साैंदर्य, परमार्थ तेथे प्रेम, आणि तुकाेबा तेथे अंत:करणाचा ओलावा.
Powered By Sangraha 9.0