देशातील महिलांनी मेहनतीच्या बळावर विविध क्षेत्रांतील सर्वाेच्च पदे प्राप्त केली आहेत. स्वबळावर विविध क्षेत्रांत त्या नावलाैकिक मिळवत आहेत, सातत्याने पुढे जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या कर्तृत्वावर चर्चा व्हावी, असे आवाहन काेलकात्यातील भारतीय प्राणिशास्त्र सर्वे क्षण संस्थेच्या संचालक डाॅ. द्रिती बॅनर्जी यांनी केले.भारतीय विज्ञान परिषदेनिमित्त आयाेजित महिला विज्ञान परिषदेच्या समाराेपप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. नाेबेलविजेत्या शास्त्रज्ञ डाॅ. अदा याेनथ, डाॅ. हॅगीथ याेनथ, राष्ट्रीय फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशाेधन संस्थेच्या संचालक डाॅ. शशी बाला सिंग, भारतीय विज्ञान परिषदेच्या अध्यक्षा डाॅ.विजयलक्ष्मी सक्सेना, सचिव डाॅ. एस.रामकृष्णन, महिला विज्ञान परिषदेच्या संयाेजक डाॅ. कल्पना पांडे आदी यावेळी उपस्थित हाेते.
भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या 105 वर्षाच्या इतिहासातील डाॅ.द्रिती बॅनर्जी या पहिल्या महिला संचालक आहे.महिलांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत.संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याचा विचार करावा. महिलांना त्या स्वत:च पुढे नेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत:शीच स्पर्धा करावी, असे डाॅ.शशी बाला सिंग यांनी सांगितले. विज्ञान तंत्रज्ञानाचे क्षेत्र महिलांसाठीही खुले आहे.प्रत्येक क्षेत्रात त्यांना उत्तम काम करण्याची संधी आहे, असे डाॅ. अदा याेनथ यांनी सांगितले.