शाैर्यवर्णनाचे प्रसंगी भाटांनी रचलेले पाेवाडे वीररसात म्हणावे आणि कथा केव्हाही रूक्ष व कंटाळवाणी हाेऊ नये म्हणून तिला प्रसन्न विनाेदांचीही झालर लावावी. राैद्र, करुण, आदी सर्व नवरसांनी ती यु्नत असावी आणि उत्तम गद्य भाषण व त्याला सुरेख गीतांची जाेड अशी काैतुकास्पद अंगाने कथा रंगत गेली जाईल हे पाहावे. इतर ज्येष्ठांच्या मार्गदर्शक वचनांचा वापर जरूर करावा. मात्र हे सर्व करताना ते सत्यशास्त्र, नीती व सदाचरण यांना अनुकूल असेल असे काटाकाळजीने पाहावे.मागील पिढीतील लाेकप्रिय कीर्तनकार, निजामपूरकरबुवा, ओतूरकरबुवा, आफळे बुवा आणि आजचे बाबामहाराज सातारकर वगैरेंच्या श्राेतृप्रेमाचे हे जणू रहस्यच आहे.
त्याचप्रमाणे आचार्य अत्रे, बाळशास्त्री हरदास, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे, प्रा. शिवाजीराव भाेसले, प्रा. राम शेवाळकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, इत्यादी प्रचंड लाेकप्रिय झालेल्या व्नत्यांच्या व्नतृत्वशैलीचा अभ्यास केला, तर या सर्वांनी श्रीसमर्थांची ही सूत्रे सहजतेने आपल्या व्नतृत्वशैलीत आणलेली आपणास दिसतील आणि श्रीसमर्थांची शिकवण कालातीत आणि चिरंतन मार्गदर्शक आहे याचा सहजपणे प्रत्यय येईल. कीर्तनाच्या श्रवणाने प्रसंगानुरूप ताे ताे रस श्राेत्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे.
त्यासाठी याेग्य ठिकाणी टाळ, मृदंग, झांजा, संगीत आणि दाणेदार सुरेल ताना यांचाही वापर अवश्य करावा. अर्थात या अनेक सूत्रांपैकी त्या त्या प्रसंगाला आणि विषयाला रसानुकूल ठरेल असाच ताे वापर असला पाहिजे. कीर्तनाच्या बहिरंगाचे वर्णन पूर्ण करताना श्रीसमर्थ आणखी एक महत्त्वाचे मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, श्राेत्यांनी रंगून जावे म्हणून व्नत्याने हे सर्व करताना एक महत्त्वाची काळजी घ्यावी की, या बहिरंगात स्वत: रंगून जाताना आपल्या विषयाचे आणि कथेचे भान, संदर्भ आणि अनुसंधान तुटणार नाही ही काळजी घ्यावी.कारण शेवटी बहिरंगापेक्षा अंतरंग महत्त्वाचे आहे हे निश्चित.
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299