बाेध : याच वयात मुले कशानेही ार प्रभावित हाेतात. वाईट सवयी, व्यसने चटकन लागू शकतात. अशावेळी त्यांना समुपदेशनाची (Counselling) गरज असते. म्हणून आई- वडिलांनी मित्राची भूमिका निभवावी. जिवलग मित्राप्रमाणे माेकळेपणाने वागून त्याला बाेलते करून त्याच्या मनातील शंका, भीती दूर करावी. त्याला समजावून सांगावे, ताे चुकल्यास चुकांबद्दल माफ करावे.म्हणजे मग त्याची निकाेप वाढ हाेईल. कुठलीही मानसिक विकृती, व्यसन, आत्महत्या, एखादा असाध्य आजार, वाईट वळण यांना ताे बळी पडणार नाही. तसेच मनातील लपवणारही नाही किंवा काेडगाही बनणार नाही.
बाेध : मूल वाढवताना त्याची मानसिकता जबाबदारीने जपावी व वयानुसार प्रेम, शिक्षा आणि मित्रवत व्यवहार करावा.