गीतेच्या गाभाऱ्यात

06 Jan 2023 17:18:32
 
पत्र चाैतिसावे
 

Bhagvatgita 
तुझा प्रश्न चांगला आहे. तुला समजेल असे उत्तर असे कीगहू, तूप व साखर या तीन वस्तूंचा उपयाेग करून एक उत्कृष्ट प्नवान्न केले आहे.तांदळाचे प्नवान्न करतात, एखाद्याला तांदळाचे प्नवान्न आवडत नाही, त्याला गव्हाचे प्नवान्न आवडते.वरचे प्नवान्न पाहून ताे गृहस्थ म्हणेलहे गव्हाचे प्नवान्न आहे.काही लाेक प्नवान्न करताना डालडा वापरतात. एखाद्याला डालडा आवडत नाही. त्याला वाटत असते प्नवान्नात डालडा न वापरता तूप वापरले पाहिजे. असा गृहस्थ वरचे प्नवान्न पाहून म्हणेलहे तुपाचे प्नवान्न आहे.प्नवान्नात केव्हा केव्हा गुळ वापरतात. एकाद्याला वाटते की प्नवान्नात गूळ न घालता साखर घालावी म्हणजे प्नवान्न चांगले हाेते. असा गृहस्थ वरचे प्नवान्न पाहून म्हणेलहे साखरेचे प्नवान्न आहे.
 
या छाेट्या उदाहरणावरून तुला कळून येईल कीप्नवान्न एकच, पण एकजण म्हणेल- हे गव्हाचे प्नवान्न आहे, दुसरा म्हणेल- हे तुपाचे प्नवान्न आहे, तर तिसरा म्हणेल, हे साखरेचे प्नवान्न आहे.खरे पाहू जाता गहू, तूप व साखर या तिन्हींचा उपयाेग करून ते प्नवान्न बनवण्यात आले आहे.गीतेच्या बाबतीत असाच प्रकार आहे. गीतेमध्ये ज्ञान आहे, कर्म आहे. भ्नती आहे. तात्पर्य अथवा रहस्य काढताना काेणी ज्ञानावर जाेर देतात, तर कर्मावर जाेर देतात, तर काेणी भ्नतीवर जाेर देतात.कशावर जाेर द्यायचा, हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. तू असे लक्षात घे कीज्ञान कर्म व भ्नती यांचा उपयाेग करून तत्त्वज्ञानाच्या प्रांतात जे सर्वाेत्कृष्ट प्नवान्न बनविण्यात आले ते म्हणजे गीतामृत.लाेकमान्यांचे मत असे आहे कीज्ञानमूलक भ्नितप्रधान कर्मयाेग.
 
हे गीतेचे तात्पर्य अथवा रहस्य आहे.साध्या भाषेत ह्याचा अर्थ असा आहे कीगीतेमध्ये ज्ञान आहे. कर्म आहे व भ्नती आहे आणि विशेष म्हणजे भ्नित प्रधान आहे.आद्य श्रीशंकराचार्यांनी गीतेचे तात्पर्य काढताना ज्ञानावर जाेर दिला, पण तू असे लक्षात घे कीआत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आचार्यांनी आसेतुहिमाचल हिंडून वैदिक धर्माचा ध्वज फडकावला व अत्युच्च, अति उदात्त व अति उत्तुंग कर्म केले.
हे कर्म त्यांनी अनहंकार बुद्धीने ईश्वराची सेवा म्हणून केले.ते म्हणतात- यद्ययत्कर्म कराेमि तत्तदखिलं शंभाे तवाराघनम्। शंकरा जे जे कर्म मी करताे ते सर्व तुझी आराधना आहे.गीतेच्या पारिभाषिक भाषेत या कर्माला ‘अकर्म’ अशी संज्ञा आहे.
 
*** तुला एक खूणगाठ सांगताेगीतेमध्ये ज्ञान आहे, कर्म आहे व भ्नती आहे. काेणत्या भागावर जाेर देऊन गीताधर्माचा जाेर कायम ठेवणेचा ते काळ पाहून ठरवणेचे असते.
Powered By Sangraha 9.0