3. प्रवास - प्रवासात अनाेळखी लाेक, कधी न पाहिलेले प्रदेश, तेथील चालीरिती आणि अचानक येणारी संकटे; तसेच हवामानातील बदल या गाेष्टींचा सामना करावा लागताे. अशावेळी व्यक्ती जर विद्वान असेल, तर ती सर्वत्र वंदनीय ठरते. कारण ती सर्वांशी संवाद साधू शकते. आपल्या पांडित्याने, वाक्चातुर्याने लाेकांची मने जिंकून घेऊ शकते.त्यामुळे त्याची काळजी घेतली जाते.
4. माता - माता जशी डाेळ्यात तेल घालून मुलांची काळजी घेते, रक्षण करते, तशीच काळजी विद्या, विद्वत्तादेखील घेते. कारण अशी चाणाक्ष व्यक्ती फसवणूक, आपलेपणा, धाेकाही लगेच ओळखून आपला पवित्रा बदलू शकते.