एका माणसाला विडी ओढण्याचे ार व्यसन हाेते. ताे आजारी पडल्यावर त्याने डाॅक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी साेडणार नाही.’ त्याचा डाॅक्टर ार हुशार हाेता. त्याने त्याला एक गाेळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती ताेंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गाेळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे, म्हणजे प्रपंचाची हावही कमी हाेईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू.जाेपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे, ताेपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही.प्रारब्धाने प्रपंच आला आहे, ताे कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे, या कल्पनेने ताे करू नका.
आपले खरे समाधान भगवंताजवळच आहे, ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात ना व्हावा म्हणून व्यापार करतात, ताे हाेत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही. तसेच प्रपंचात समाधान हा ायदा आहे; ताे जर मिळत नसेल, तर प्रपंचाचा लाेभ धरण्यात काय ायदा आहे? ‘आता तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग,’ असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्ट्या समाधान व्हायला खराेखरीच कशाची जरूरी नाही; पण ही गाेष्ट कुणाला पटत नाही.आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली, तरी आपण पूर्ण सुखी हाेत नाही.
कैदेतल्या माणसाला ‘मी सुखी आहे’ असे वाटणे कधी शक्य आहे का? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खराेखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लाेक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लाेक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत.या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. प्रपंची लाेकांचा स्वभाव ार विचित्र आहे. त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लाेक कामापुरते एकत्र जमलाे आहाेत. ज्याप्रमाणे आगगाडीत पुष्कळ प्रवासी एकत्र जमतात, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमताे. पाचजण मिळून प्रपंच बनताे. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असताे. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे?