वाच्यार्थ: 2. मन असेपर्यंतच दया, क्षमा, करुणा इ. मनाेभाव जागृत हाेणे, इतरांची मदत करावीशी वाटणे शक्य आहे.
3. बुद्धी आहे ताेपर्यंतच शिकता येईल, वैचारिक प्रगल्भता वाढत जाईल आणि मानवी कल्याणाचे मार्ग शाेधता येतील.
4. शरीरात आत्मा असेपर्यंतच सत्संगतीने आत्माेन्नती करून जीवन सफल करता येईल.
बाेध : स्वार्थ आणि परमार्थ साधण्यातच मनुष्यजन्माचे सार्थक आहे आणि निराेगी स्थितीतच ते शक्य आहे.
मृत्यू केव्हा गाठेल हे सांगता येत नाही. त्यामुळे भूतकाळापासून प्रेरणा घेऊन भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक क्षण सार्थकी लावावा.