नमस्कारे पतित पावन। नमस्कारे जन्ममरण। दुऱ्ही दुऱ्हावे ।।2।।

25 Jan 2023 17:25:33
 
 

Saint 
 
ते म्हणतात की एखाद्याने पाप, गुन्हा किंवा माेठे दुष्कृत्य केले आणि नंतर जर ताे पश्चात्तापाने पाेळून एखाद्या श्रेष्ठ माणसाच्या पायी दंडवत घालता झाला तर त्या श्रेष्ठाने त्याचे पश्चात्तापाने पाेळलेले अंत:करण जाणून त्याला क्षमा केलीच पाहिजे.म्हणजेच नमस्काराइतके आदर्श असे भ्नतीचे साधन नाही व त्यातच सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे. वंदन भ्नतीने काय साध्य हाेते हे जाणल्यानंतर हा भ्नतीमार्ग किती सुलभ साेपा आहे ते ही पाहण्यासारखे आहे. वंदन करण्याला हाेमहवनाप्रमाणे माेठी र्नकम खर्च करावी लागत नाही.त्यामुळे अगदी गरीब भ्नतही ते करू शकताे.तप केल्यासारखे शरीरकष्ट त्यात नाहीत किंवा विशिष्ट उपकरणांची त्याला गरज नाही.
 
त्यामुळे ही वंदनभ्नती विनाकष्ट, विनापैसा आणि काेणत्याही वृद्ध वा दुर्बल शारीरिक अवस्थेतही सहजपणे करता येते. कारण विनम्र व लीन हाेण्यासाठी काहीही लागत नाही. एक मस्तक, दाेन हस्तक व शरणागत भाव या केवळ तीनच गाेष्टी त्याला पुरेशा आहेत. इतकेच हे भ्नतीचे साेपे साधन आहे. या समासाचा निष्कर्ष काढताना श्रीसमर्थ म्हणतात की, ज्या साधूला आपण सद्भावाने नमस्कार करताे त्यालाच आपल्या हिताची काळजी लागते व ताे आपणास बराेबर मु्नतीमार्गावर घेऊन जाताे.वंदनभ्नतीने भगवंत, संत, महंत आणि साधू आपल्यावर प्रसन्न हाेतात हे जाणून साधकाने श्रद्धायु्नत मनाने हा भ्नतीमार्ग अनुसरावा! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0