काही लाेक म्हणतात की, मुनिश्री तरुणसागरजी कथा सांगताना खूप खूप हसवतात, मजा येते.अरे बाबा! ही कथा आणि प्रवचन काय हसण्यासाठी आहे? उलट प्रवचन आणि कथा ऐकल्यानंतर रडायला तर आलेच पाहिजे की, आतापर्यंतचे माझे जीवन असेच खाण्या-पिण्यात आणि झाेपण्यात गेले.सत्संग काही मनाेरंजनासाठी नाही, मनाेभंजनासाठी आहे.संत आणि मुनींच्या चरणी केवळ झुकायचे नसते, तर त्यांच्या चरणी लीन व्हायचे असते.