2. कासव (मादी) कासव हा उभयचर प्राणी आहे, पाण्यात आणि जमिनीवर राहणारा. त्याच्या स्नेहपूर्ण नजरेने त्याच्या पिलांचे पालन हाेते.
3. पक्षिणी - आकाशात विहार करणाऱ्या पक्षिणी आपल्या पंखाच्या उबदार स्पर्शाने चाेचीतून घास देऊन पिलांचे पाेषण करतात.
4. सत्संग - मनुष्यप्राण्याचा ‘मानव’ (मनुष्य) हाेण्यासाठी सत्संग आवश्यक आहे. माणसाच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती हाेणे आवश्यक आहे आणि आत्म्याचे पाेषण दुरूनच; परंतु केवळ सत्संगानेच, माऊलीस्वरूप साधुपुरुषांच्या सहवासातच हाेते. अशा व्यक्तींच्या संगतीने सहवासातील व्यक्ती सदाचरणी बनते, तिचे आत्मबळ वाढते आणि जीवन सफल हाेते.
बाेध : मातेसमान प्रेमच शरीर, मन, भावना आणि आत्मा बळ देते. यांचे पाेषण करते व बळ देते.