ओशाे - गीता-दर्शन

23 Jan 2023 19:23:47
 
 
 

Osho 
नाही, मग माेठ्या घटना घडण्यासाठी लागणारी पात्रता अशा माणसात येऊ शकत नाही. कृष्ण म्हणताे, ‘जाे सुख-दु:खांमध्येही डळमळत नाही, त्याची चेतना स्थिर असते.’ अन् अशी चेतना परमात्म्याच्या आत विराजमान आहे.परमात्मा अशा चेतनेच्या आत विराजमान आहे.’ चला, निष्कंप चेतनेकडे चला. सुखापासून सुरू करा. दु:खापासून कधीही सुरू करू नका.सुखापासून सुरुवात केली की गाेष्ट दु:खापर्यंत पाेहाेचते. दु:खापासून सुरू करण्याच्या भानगडीत चुकूनसुद्धा पडू नका. दु:खापासून ती गाेष्ट कधी सुरूच हाेत नसते.सुख जरा नीट पारखून पहा, म्हणजे सुख हे दु:खाचंच रूप असल्याचं लक्षात येईल. सुखाचेच संशाेधन करा, मग लक्षात येईल की, सुखातच दु:खाची सारी बीजे, साऱ्या श्नयता दडल्या आहेत आणि सुखामुळे कंपन हाेणार नाही एवढी दक्षता घ्या.
 
त्यासाठी काय करायचं? सुखामुळे आपल्यात कंप हाेऊ नये यासाठी सगळी ताकद लावून उभं राहायचं काय? जर आपण असे उभे राहिलात, तर मग आपण आधीच कंप पावला आहात.एखाद्यानं जर असं म्हटलं, ‘मी तर अंधारातून न भिता, न घाबरता निघून जाताे... डाेळे झाकून घेताे, हात जाेराने आवळून घेताे, अगदी ताकद लावून.’ तर त्याचा अर्थ काय हाेताे? ते हात आवळणे, डाेळे बंद करणे, ही भीतीचीच तर लक्षणे आहेत. मी अंधारात न भिता जाताे, हे या माणसाचे व्नतव्यही भ्यालेल्या माणसाचेच व्नतव्य आहे. नाहीतर माणूस चालणं संपवताे तरी अंधार त्याच्या खिजगणतीतही नसताे. दिवसा तर हा माणूस असं काही म्हणत नाही, की मी दिवसाढवळ्या न भिता जाताे.
Powered By Sangraha 9.0