आपल्या मनातील गुह्य अर्जुनाला सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर मग श्राेत्यांना थाेडा उपदेश करताना दिसतात. श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील हे राजगुह्य ऐकून संजयाने धृतराष्ट्रास म्हटले की ‘राजा, हे सावळे परब्रह्म अर्जुनाला असा उपदेश करीत हाेते. राजा, ऐकताेयस ना?’ संजयाने इतके म्हटले तरी धृतराष्ट्र स्तब्धच दिसला. त्याच्या मनाला थाेडाही आनंद झालेला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, पाण्यातून म्हैस जशी उठत नाही, तसा धृतराष्ट्र पुत्रमाेहात गुंतून राहिला. हे पाहून संजय मनात म्हणाला, या म्हाताऱ्याला आता काय करावे? आज इथे अमृताचा पाऊस पडला.परंतु त्याचा शिडकावा चुकविण्यासाठी धृतराष्ट्र शेजारच्या गावी गेला.
हा आमचा खरे पाहता स्वामी. याला दाेष ेणे बराेबर नाही, पण स्वभावाला काेण काय करणार? पण आपले भाग्य मात्र थाेर. श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद सांगण्याचे भाग्य आपणांस लाभले.हा विचार मनात येऊन संजयाची वाणी माैन झाली.त्याच्या अंगाला घाम सुटला. डाेळे अर्धवट उघडे व झाकलेले झाले. त्यांतून आनंदाचे अश्रू येत हाेते.सुखाने अंग कापत हाेते. राेमरंध्रांच्या ठिकाणी घामाचे माेती निर्माण हाेऊन त्यांची माळ त्याच्या अंगावर शाेभू लागली.श्रीकृष्णांचे बाेलणे घाें घाें करून त्याच्या अंगावर आले आणि ताे देहभानावर आला. त्याने घाम पुसला.डाेळ्यांतील अश्रू पुसले. ताे धृतराष्ट्राला म्हणाला, ‘राजा, श्रीकृष्णांचे बाेलणे हे निवडलेले शुद्ध बीज आहे. जमीन सत्त्वगुणांनी संपन्न आहे. आणि श्राेत्यांना उत्तम पिकाचा लाभ झाला आहे.