वाच्यार्थ:मासा पिलांना पाहून, कासव त्यांच्या पिलांवर नजर ठेवून, तर पक्षीण आपल्या स्पर्शाने पिलांचे पाेषण करते. त्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात मानवाचे पालनपाेषण हाेते.
भावार्थ : पाण्यात राहणारा मासा, पाणी व जमिनीवर राहणारा (उभयचर) कासव तसेच आकाशात विहार करणारे पक्षी आपल्या पिलांचे पाेषण मनुष्यप्राण्यापेक्षा वेगळ्या प्रकारे करतात.सत्संगतीनेही मानवी आत्म्याचे असेच (दुरून) पाेषण हाेते.
1. मासा (मादी) : केवळ दृष्टिक्षेप टाकताे आणि पिलांचे पालन हाेते. दूर राहूनच हे घडत