गीतेच्या गाभाऱ्यात

23 Jan 2023 19:41:05
 
पत्र छत्तिसावे
 
 

Bhagvatgita
Bhagvatgita 
(17) श्रद्धात्रय विभाग याेग या अध्यायात तीन प्रकारची श्रद्धा सांगितली आहे. (1) सात्त्विक (2) राजस व (3) तामस. श्रद्धेप्रमाणेच आहार, यज्ञ, तप, दान हेही तीन प्रकारचे आहेत-(1) सात्त्विक (2) राजस व (3) तामस.तू सात्त्विक हाे. तुझा विचार सात्त्विक असू दे, उच्चार सात्त्विक असू दे व आचार सात्त्विक असू दे.
 
(18) माेक्षसंन्यास याेग.हा अठरावा शेवटचा अध्याय म्हणजे गीतेचा उपसंहार आहे. या अध्यायाला कांहीनी माेक्षसंन्यास याेग असे नाव दिले आहे तर काहींनी नुसतेच संन्यास याेग असे नाव दिले आहे.संन्यास म्हणजे घरदार प्रपंच साेडून भगवी वस्त्रे धारण करणे असा अर्थ केला जाताे, पण भगवंतांनी असे सांगितले कीसर्व कर्मे साेडणे म्हणजे संन्यास नव्हे तर काम्य कर्मे साेडणे म्हणजे संन्यास.
काेणतेही कर्म सदाेष असते म्हणून साऱ्या कर्माचा त्याग करावा असे विद्वान म्हणू लागले हाेते. हे लाेक यक्ष, दान, तप असली कर्मे देखील साेडू लागले हाेते.
 
भगवान कृष्णानी हात उंच करून संदेश दिला की- बाबांनाे, यज्ञ दान तप असली कर्मे टाकू नका. मात्र ही कर्मे फलाची अपेक्षा न करता करा.साऱ्या गीतेला प्रेरक ठरणारा मंत्र म्हणजे निष्काम मंत्र तू लक्षात ठेव Taj for beauty and Geeta for dutyगीतेला सांगावयाचे आहे की बाह्य फलाची अपेक्षा न करता कर्तव्यकर्म करा. कर्तव्याकरता कर्तव्य (Duty for Duty's sake)) करत असताना इतका आनंद हाेत असताे की ताे आनंद हेच खरे फल आहे. ते फल माणसाला मिळतेच.बाह्य फळ माणसाला मिळेल अगर न मिळेल. केवळ बाह्य फलावर सारी नजर ठेवून आपण कर्म करू लागलाे तर कर्म जितके चांगले व्हायला पाहिजे तितके हाेत नाही.
 
परमेश्वराला अर्पण करून आपण कर्तव्य कर्म करू लागलाे व त्यात आपण रंगून गेलाे म्हणजे आपणाला पराकाष्ठेचा आनंद हाेताे. हेच आंतरिक फल आहे. या फलापुढे बाह्य फल फारसे महत्त्वाचे नसतेगीतेचा उपसंहार असलेला हा अध्याय तू नीट वाच. या अध्यायातील ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे हा विचार मला पराकाष्ठेचा महत्त्वाचा वाटताे. तू लक्षात घे कीदेव देवळात नाही, मशिदीत नाही, चर्चमध्ये नाहीतर ताे सर्वांच्या हृदयात आहे.त्या देवाचा तुला स्पर्श झाला म्हणजे तुझे सारे जीवन पालटून जाईल.गीतेचा उपसंहार वाचून तू समजून घे कीआपल्या जीवनात राम नाही असे माणसाला केव्हा केव्हा वाटते, पण जेव्हा आपल्या अंतरंगात असलेला देवाचा स्पर्श आपणाला हाेताे तेव्हा परमार्थाचे काेंब आपणाला फुटतात.जीवनात राम दिसू लागताे. अंतरंगात आनंदाचे असंख्य दिवे झगमगू लागतात. स्वर्गवीणेच्या तारा निनादू लागतात.
Powered By Sangraha 9.0