आपल्या तरि झडझडाेनि वहिला निघ। इये भक्तीचिये वाटे लाग।। जिया पावसी अव्यं। निजधाम माझें ।। 9.516

21 Jan 2023 13:26:55
 

Dyaneshwari 
 
आपल्या उपदेशाचे सारच ज्ञानेश्वर या ठिकाणी अर्जुनास सांगत आहेत. हे जग कसे आहे व त्याचा काय विचार करावयास हवा याचे निदर्शन येथे केले आहे. भाेग्य विषय देहाच्या सुखासाठी असले तरी हा देह मात्र काळाच्या मुखात आहे असे मानावे.आपले मस्तक ताेडून कधी पायाच्या जखमेवर बांधता येईल का? मृत्युलाेकाची कहाणी अशीच आहे. येथे सुख ऐकायलाही मिळत नाही. विंचवाच्या अंथरूणावर झाेप कशी येणार? या मृत्युलाेकातील चंद्र क्षयराेगी आहे. सूर्याचा उदय अस्तासाठीच आहे. सुखाचा अंगरखा घालून येथे दु:ख वावरत असते. येथील सर्व काही नाहीसे हाेणारे आहे.येथील माणसे ऐहिक व पारलाैकिक सुख व्हावे म्हणून आपल्या भांडवलातून एक कवडीही खर्च करणार नाहीत आणि ज्यात सर्वस्वी हित आहे अशा कामासाठी काेट्यवधी रुपये खर्च करणार नाहीत आणि ज्यात सर्वस्वी अहित आहे अशा कामासाठी काेट्यवधी रुपये खर्च करतील.
 
इंद्रियसुखात खरा आनंद काेणता? केवळ वय वाढले म्हणून त्याच्या पाया पडण्याची रीत येथे आहे. मूल माेठे हाेत असताना ते एकेक पावलाने काळाच्या मुखात जात असते हे आपण कसे ध्यानात धरत नाही? येथील वाढदिवस गुढ्या उभारून साजरा करतात हे कितपत याेग्य आहे? साप बेडकाला धरताे आणि त्याच वेळी बेडूक आपल्या जिभेने माशा पकडीत असताे. अर्जुना, या मृत्युलाेकातली रीत अशी ही अत्यंत घातक आहे. लाभाच्या लाेभाने येथील विषयवासना वाढते. पण तू दैववशात माझा सखा झालास. आता या संसारचक्रातून तू अंग झाडून बाहेर निघ आणि भक्तिमार्गाला लाग. म्हणजे माझ्या रूपाला येऊन पाेहाेचशील
Powered By Sangraha 9.0