पत्र छत्तिसावे तू असे लक्षात घे की- निर्गुण भ्नताला देखील सगुणाचा आधार लागताे. लक्ष्मण रामाचा सगुण भ्नत आहे. भरत रामाचा निर्गुण भ्नत आहे. दाेघेही फार थाेर भ्नत आहेत.निर्गुण भ्नत भरत रामाला म्हणताे - ‘रामा तुझ्या नावाने मी राज्य करताे, पण मला जरा हुरहूर लागली आहे रे.’ मग भरत रामाच्या पादुका ठेवून घेताे व त्याच्या नावाने राज्य करताे.या गाेष्टीतील रहस्य समजून घे.या अध्यायात भ्नताची छत्तीस लक्षणे सांगितली आहेत.छत्तीस गुण जुळले म्हणजे पत्रिका उत्तम जुळली असे म्हणतात. भ्नताला हे छत्तीस गुण आले म्हणजे भ्नताची व देवाची पत्रिका जुळली.तू अधून मधून हा अध्याय वाच व आपली पत्रिका किती जुळते ते पाहत जा. हा अध्याय तू अधून मधून गुणगुणत जा व छत्तीस गुणांपैकी आपल्या अंगी किती गुण आहेत त्याची चाचणी घेत जा.
(13) क्षेत्रक्षेत्रज्ञयाेग तेराव्या अध्यायात क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा विचार आहे.क्षेत्र म्हणजे शरीर या क्षेत्राला जाे जाणताे ताे क्षेत्रज्ञ म्हणजे ईश्वर.
मनुष्य देहाला देव मानताे व त्या देहाचे चाेचले पुरवताे देह म्हणजे सद्गुणांचे पीक काढण्याकरता एक साधन आहेते शेत आहे या बुद्धीने तू देहाकडे पहा. एकदा गाैतम बुद्ध एका शेतकऱ्याकडे भिक्षा मागायला गेले असताना ताे शेतकरी म्हणाला--‘‘अशी भीक कशाला मागताेस? माझ्यासारखा शेतकरी हाे.’’ गाैतम बुद्ध म्हणाले--‘‘गड्या मी देखील एक शेतकरीच आहे. हा देह हे माझे शेत. विवेकाच्या नांगराने मी हे शेत नांगरताे व सद्गुणांचे पीक काढताे.’’ या अध्यायात ज्ञानाची वीस लक्षणे सांगितली आहेत.अमानित्व, अदंभित्व, अनहंकार वगैरे वीस सद्गुण म्हणजे ज्ञान असे भगवान म्हणतात.साॅक्रेटिस लाेकांना सांगायचा - ज्ञान म्हणजे सद्गुण, अज्ञान म्हणजे दुर्गुण, गीतेची हीच शिकवणूक आहे. असल्या शिकवणीबद्दल साॅक्रेटिसावर खटला भरला गेला. 280 लाेक म्हणाले- साॅक्रेटिस दाेषी आहे.
220 लाेक म्हणाले साॅक्रेटिस निर्दाेषी आहे. बहुमताने साॅक्रेटिस दाेषी ठरला व त्याला विषप्राशनाने देहांताची शिक्षा देण्यात आली. मरणापूर्वी ताे लाेकांना तुरुंगात सांगत हाेता -- आत्मा अमर आहे.पाश्चात्त्य लाेकांना वाटते की तत्त्वज्ञांचा बाप म्हणजे साॅक्रेटिस. तू असे लक्षात घे की- हा तत्त्वज्ञांचा बाप गीतेचीच शिकवणूक लाेकांना देत हाेता. गीता हीच त्याची गाथा हाेती.दुसऱ्या अध्यायात अठरा श्लाेकांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे भगवानांनी सांगितले आहेत, बाराव्या अध्यायात भगवानांनी भ्नताचे छत्तीस गुण सांगितले आहेत. या अध्यायात भगवानांनी भ्नताचे छत्तीस गुण सांगितले आहेत.या अध्यायात भगवानांनी ज्ञानाची वीस लक्षणे सांगितली आहेत. या साऱ्यामध्ये साम्य आहे. हेतू लक्षात घे व आपल्या वागण्यामध्ये या गुणाचा प्रकाश पाडण्याची खटपट कर. जेव्हा वाणी, लेखणी व करणी यांचा ताल व सूर जुळताे तेव्हाच आपल्या जीवनात गाेड संगीत सुरू हाेते.