ताेच अकंप बनू शकताे.याेगारूढ हाेण्यापूर्वी असे अकंप हाेणे, अशी निष्कंप अवस्था येणे जरूरीचे आहे.खरंतर या निष्कंप अवस्थेतच माणसाला इतकी ऊर्जा, इतकी श्नती मिळते, इतकी स्वाधीनता, इतकी स्वतंत्रता मिळते की, आता ताे ‘स्व’ झाला. त्याला ‘स्वयं’ प्राप्त झाला, असे म्हणता येते. या याेग्यतेतच त्याचं परमात्म्याशी मीलन हाेतं. हे त्याच्या आधी हाेऊ शकत नाही.जाे सुख-दु:खांनी कंप पावताे ताे इतका दुबळा असताे की, ताे परमात्म्याला सहनही करू शकणार नाही. चांदीच्या एका नाण्याला पाहून त्याच्यात कंप निर्माण हाेताे, एक छाेटासा काटा ज्याचे प्राण कासावीस करून टाकताे, एखाद्या व्य्नतीला एक तिरपा कटाक्ष ज्याची रात्रभरची झाेप खराब करताे, इतका ताे कमजाेर आहे, तर मग परमात्म्याची कृपाच म्हटली पाहिजे की, ताे त्याला भेटत नाही.नाहीतर ताे माणूस दुभंगून, फुटून, तुटून, विस्फाेटून खलासच हाेऊन जायचा, नष्टच हाेऊन जायचा.
जाे एका रुपयाने चळताे, एखादा रुपया रस्त्यावर पडून हरवला तर ताे माेठ्या अडचणीत सापडताे, तर त्याच्या जीवनात एवढी माेठी घटना ताे पेलू शकणार नाही. ताे आतून अजून इतका क्रिस्टलाइजड संघटित नाहीये. इतका श्नितवान नाहीये की परमात्म्याला पेलू शकेल. त्याची अजून ती तयारी झालेली नाही.त्याच्यात अजून ती पात्रता आलेली नाही.सगळं काही नियमानं घडतं. आपण ज्या दिवशी स्वाधीन व्हायला पात्र व्हाल, त्याच दिवशी परमसत्ता आपणांमध्ये अवतरित हाेते. ती सदाचीच तयार असते असं उतरायला. पण आपण इत्नया क्षुद्र गाेष्टींमध्ये डाेलता आहात, डगमगता आहात की त्याचा हिशेबच नाही!