ओशाे - गीता-दर्शन

19 Jan 2023 23:40:00
 
 

Osho 
 
आपला चेहरा किती सुंदर आहे. बस्स आपण कंप पावलातच. आता आपला उपयाेग करून घ्यायला आपण लायक झालात.आता आपणास गुलाम करणं ार साेपं आहे.‘काय हुशार आहात आपण! आपल्यासारखं डाेकं दुसरीकडे कुठे शाेधूनही सापडणार नाही.’ बस्स. असं आपणास म्हटलं की आपण कंप पावलातच. त्या माणसाने आपणास बुद्धिमान म्हणून आपणाला बुद्दू करून टाकलं. आता आपणापेक्षा कमी बुद्धिमान माणूसही आपणाला गुलाम करून टाकताे. कंप पावलात की कमजाेर झालात. कंप पावलात की पराधीन हाेऊन गेलात.जाे काेणी अंतर्यामी सुखदुःखात कंप पावताे ताे कधीही गुलाम हाेऊन जाईल. त्याची पराधीनता सुनिश्चित आहे. ताे आताच पराधीन आहे. एक छाेटासा शब्द बाेला. की ताे कंपित झालाच. ज्याला सुख-दुःख कंपवीत नाहीत.
 
फ्नत त्यालाच पराधीन करता येत नसते. आता त्याला काेणीही पराधीन करू शकत नाही. त्या माणसाच्या मनात कंप निर्माण करण्याचा काही उपायच राहिला नाही. आता तलवारी त्याचे शरीर कापू लागल्या तरी ताे स्थिरच राहील. आता त्याच्या चरणी साेन्याचा पाऊस पडला तरी मातीच्या पावसाहून वेगळं काही हाेतयं.असा अनुभवच त्याला यायचा नाही. आता सगळ्या पृथ्वीचं सिंहासन जरी त्याला मिळालं तरी मातीच्या ढिगावर जसा चढेल तसाच ताे या सिंहासनावरही चढेल आणि मातीच्या ढिगावरून जसा ताे उतरेल, तसाच ताे या सिंहासनावरूनही उतरेल.आंतरिक श्नती येते ती अकंप राहिल्याने जाे काेणी अकंपाला उपलब्ध हाेताे. त्याला आंतरिक ऊर्जा म्हणजेच परमश्नती मिळते. जी सुख - दुःखातही कंपन पावत नाही.
Powered By Sangraha 9.0