या तैंसे माझिये भक्तीविण। जळाे तें जियालेपण। अगा पृथ्वीवरी पाषाण। नसती काई ।। 9.436

19 Jan 2023 23:33:23
 
 

Dyneshwari 
 
आपल्या प्राप्तीसाठी भक्ताची जात अथवा त्याचे पूर्वकर्म आड येत नाही हे भगवंतानी सांगितले.त्याचप्रमाणेच आपल्या भक्तीशिवाय इतर सर्व व्यर्थ असते, हेही भगवंत वारंवार स्पष्ट करतात. माझ्या ठिकाणी भक्त मिळाला की त्याचे कुळ पवित्र हाेते. त्याच्या जन्माचे सार्थक हाेते. सर्व शास्त्रांचे अध्ययन, सर्व तपे, अष्टांग याेग केल्याचे फळ त्याला मिळते. इतके सांगून भगवंत म्हणतात की, या विषयी खूपच बाेलणे झाले. पण यात प्रेमसूत्राचा धागा ही एकच वस्तू महत्त्वाची आहे. मनबुद्धीचे सर्व व्यापार परमेश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठेने समर्पित करावेत. पण अशी भक्ती राहिली नाही तर मात्र याेग्य नाही.सूर्य उगवेपर्यंत रात्र असते. माझी प्राप्ती झाली की त्याची जीवदशा संपते. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला की पहिला दिवा काेणता हे समजत नाही, त्याच प्रमाणे माझे भजन करणारा मीच हाेऊन जाताे.
 
आत्मशांती हेच त्याचे तेज बनते म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रेमपूर्वक भक्ती अगत्याची आहे आणि ही प्राप्ती करून घेण्यासाठी उत्तम व श्रेष्ठ कुळात जन्म घेण्याची जरूरी नाही. वय, रूप, मान, अभिमान ह्यांचा डाैल मिरविण्याची जरूरी नाही. दाण्यावाचून कणसे काय कामाची? नगर उत्तम आहे, सुंदर आहे, पण माणसांवाचून ते ओस पडले आहे.त्याचा काय उपयाेग? आटलेल्या सराेवराचा माणसाला काय उपयाेग? एका दु:खिताला दुसरे दु:खी भेटून काय उपयाेग? फळावाचून ुललेले झाड काय कामाचे? त्याचप्रमाणे भक्ती जर नसेल तर उत्तम जन्म, श्रेष्ठ कुळ, संपत्ती यांचा काहीही उपयाेग नाही. माझ्या भक्तीवाचून जगणे म्हणजे त्या जगण्याला आग लागाे.पृथ्वीवर दगड का थाेडे आहेत?
Powered By Sangraha 9.0