मृत्यूचे स्वागत करावे लागते.आराेग्य, आनुवंशिकता, जेथे आयुष्य काढावे लागते तेथील हवामान यावरून मृत्युवेळ ठरलेली असते.
जसे आपण पाहताे, ओझे भरलेले पाेते पाठीवर वाहणारे, कापसाच्या गिरणीत, खाणीत काम करणारे विशिष्ट आजारांनी ग्रस्त हाेऊन विशिष्ट कालमर्यादेतच संपून जातात. जसा सुरक्षित दिवा जास्त काळ जळताे; तसेच असुरक्षित लवकरच विझून जाताे; घाई-गर्दी, ताण-तणाव यामुळे आधुनिक काळात जन्मलेल्यांचा अपमृत्यू ठरलेला आहे.
बाेध : जन्म, कर्म, धन, शिक्षण, मृत्यू याबाबत कसलीही तक्रार न करता ‘ईश्वरेच्छा बलियसी’ म्हणत समाधानाने जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा.