पत्र छत्तिसावे
छाेटा मिल्टन म्हणाला. ‘फादर, देव काेठे नाही ते मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाेन संत्री बक्षीस देईन.’ या अध्यायात चार प्रकारचे भ्नत सांगितले आहेत. तू भ्नती कर पण आंधळी भ्नती करू नकाेस. तू भ्नती कर, ज्ञान मिळव व ज्ञानी भ्नत हाेण्याचा प्रयत्न कर.
(8) अक्षरब्रह्म याेग.या अध्यायात अक्षरब्रह्माबद्दल सांगितले आहे. या अध्यायात मरणाचा विचार आहे. मनुष्य मरण हा शब्द उच्चारायला देखील भिताे. मरणाला विसरून कसे वागावे याचा सारखा ताे प्रयत्न करताे. मरणाला स्मरून कसे वागावे याचा तू अभ्यास कर. तू असे लक्षात ठेव की.मरणाचे स्मरण म्हणजे अहंकाराचे मरण आणि अहंकाराचे मरण म्हणजे परमार्थांचेतारण.भगवान कृष्ण म्हणतात मरणाच्या वेळी माणसाने माझे स्मरण केले म्हणजे ताे मला येऊन मिळताे.अग जाे स्वायीभाव असताे. ताेच मरणाच्या वेळी येताे.माझी एक नातेवाईक फार फार चिक्कू हाेती. शेवटी तिला बाेलता येईनासे झाले. तिला हेमगर्भाची मात्रा दिली. ती बाेलू लागली पण तिच्या ताेंडून देवाचे नाव आले नाही. वेळ रात्री 8 ची हाेती.
समाेर हरिकेन कंदील हाेता. ती मला म्हणाली, ‘राम कंदील तेवढा बारीक कर. तेल फार जळते आहे रे!’ मी कंदील बारीक केला आणि तिच्या जीवनाची ज्याेत देखील बारीक हाेऊन तिने या जगाचा निराेप घेतला.म्हणून याच अध्यायात जाे मरणाच्या वेळी माझे स्मरण करील ताे मला येऊन मिळेल एवढेच बाेलून भगवान थांबत नाहीत तर ते लगेच अर्जुनाला म्हणतात.तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर.सदा सर्वदा माझे स्मरण कर.तू लक्षात घे की देवाचे स्मरण हा तुझा स्थायी संस्कार हाेऊ दे म्हणजेच खऱ्या अर्थाने शेवटी तुला देवाचे स्मरण हाेईल.
(9) राजविद्या राजगुह्ययाेग.
या अध्यायात राजविद्या आहे. विद्यांचा राजा आहे. या अध्यायात राजगुह्य आहे. गुयांचा राजा आहे. या अध्यायात राजमार्ग सांगितला आहे. राजमार्ग म्हणजे भक्तिमार्ग.तू जे जे करशील ते ते देवाला अर्पण करून कर म्हणजे तुला भ्नितमार्ग साधेल.अन्न गाेड हाेण्याकरता, अन्नाला चव येण्याकरता आपण त्यात निरनिराळे मसाले घालताे. तू आपल्या जीवनात भ्नितप्रेमाचा मसाला घाल म्हणजे तुझे सारे जीवन गाेड हाेईल.ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेताना ज्या अध्यायाचे स्मरण केले ताे म्हणजे गीतेचा नववा अध्यायशबरीची उष्टी बाेरे रामाने खाल्ली यातले रहस्य तू समजून घे. महाविद्वान जनक साध्या भ्नितमार्गी सुलभेचे पाय धरताे याचे इंगित तू लक्षात घे. इतर मार्ग कडू आहेत. भ्नितमार्ग गाेड आहे. म्हणूनच असे म्हणतात कीराेग जाय दुधेसाखरे। तरी निंब का पियावा।।
(10) विभूतियाेग नवव्या अध्यायात राजयाेग म्हणजे भ्नितयाेग -जाे गुह्यतम आहेताे कृष्णाने अर्जुनास सांगितला. अनास्नती हा गीतेचा पाया आहे.देवाच्या ठिकाणी आस्नती हाेते तेव्हा अनास्नती साधते.नवव्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण म्हणाला- माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भ्नत हाे, मत्परायण हाे.