ज्याप्रमाणे देहाच्या रक्षणासाठी आवश्यक त्या बाबी केल्याच पाहिजेत.त्याप्रमाणे मानवतेच्या रक्षणासाठी देहाकडून आवश्यक ताे त्याग झालाच पाहिजे. देहाच्या रक्षणासाठी याेग्य ते व आवश्यक तेवढे खाणे पिणे घडायला हवे. मी काहीच खाणार-पिणार नाही, म्हणून चालत नाही. त्याचबराेबर मला वाट्टेल ते मी करेन, असे म्हणूनही चालत नाही. माणुसकी जाेपासायची असेल, खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा आनंद मिळवायचा असेल, तर ईर्षा, द्वेष, माेह, माया, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, मीपणा आदीचा त्याग केलाच पाहिजे. या देहाच्या रक्षणासाठी आवश्यक तेवढा व याेग्य ताेच आहार आपण सेवन करताे.
त्याचबराेबर जे मानवतेला बाधक आहे, त्याचाच आपण त्याग केला त्यापेक्षा वेगळे काही किंवा जास्तीचे करण्यात आपण कमी पडताे. त्यामुळे नारायणाने आपणाला माफ करावे आणि आपला स्वीकार करण्याची त्याने विनंती मान्य करावी. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, म्हणवुनी नारायणा । कींव भाकिताें करूणा ।। महाराजांनी ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार, लाेभ आदीच्या त्यागात तसूभरही उणीव ठेवली नव्हती. आपणालाही प्रयत्नाअंती महाराजांच्या कृपेने हे जमू शकते. हे जमणे म्हणजे आनंदच आनंद हाेय. मूळ अर्थासाठी गाथा वाचाणे आवश्यक आहे.महाराजांची गाथा हा अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448