सुखात डाेलण्याची सवय जुनाट आहे. मजबूत आहे. आपण केव्हा डाेलू लागलाे, हे आपल्याला कळतही नाही. जेव्हा काेणी आपल्याला प्रशंसेचे दाेन शब्द ऐकवताे तेव्हातर ऐकतानाच काय, त्याच्याही थाेडावेळ आधीच आपण डाेलू लागलेले असताे. त्या माणसाचा चेहरा पाहिला, वाटलं की ताे प्रशंसा करताेय, आणि आपल्या आत काहीतरी डाेलून गेलंय. प्रशंसा खाेटी असली तरीही हे डाेलणे हाेईल. तरीही हे डाेलणे का हाेईल? आपणही दुसऱ्याची अशीच खाेटी प्रशंसा करीत असता म्हणून, त्यांना डाेलवत असता म्हणून.दुसरा काेणी तुमचीही तशीच प्रशंसा करताेय आणि तुम्हालाही तसेच डाेलवताेय.तुमचं असं कंपन केल्याशिवाय तुमचा उपयाेग करणे शक्य नाही. असं कंपवूनच तुम्हाला वापरलं जाऊ शकतं. म्हणून तर इतकी खुशामत जगात चालते. आपली खुशामत केली की आपलं कंपन हाेतं, मग आपण आपल्या स्थानापासून डळमळता.
तेव्हा आपला उपयाेग करणं शक्य हाेतं, कारण डळमळताच आपण कमजाेर हाेऊन जाता.लक्षात ठेवा, आपल्या चेतनेत जसजशी कंपने हाेतात, तसतसे आपण कमजाेर हाेता. मग आपला कशासाठीही उपयाेग केला जाऊ शकताे. जाे काेणी आपली खुशामत करताे, ताे आपणास आतून कम जाेर करताे, आतल्या आत ताेडताे. म्हणून कृष्णाने येथे एक शब्द वापरला आहे - स्वाधीन. जाे सुखदुःखांमध्ये डळमळणार नाही ताेच स्वाधीन आहे. जाे सुखदुःखात सम राहील, ताेच स्वाधीन आहे. त्याला कुणीही पराधीन बनवू शकत नाही.पण आपल्याला तर कुणीही पराधीन करू शकताे.कारण आपल्याला कुणीही कंपवू शकतं. आपण कंप पावताच, आपल्या पायाखालची जमीनच सरकते. मग आपणाला काेणीही नुसतं असं म्हटलं की, आपण किती सुंदर आहात.