एकदा आपल्या भक्ताने सर्वस्व अर्पण केले की मग भगवंत त्याचे पूर्वायुष्य वा पापताप पाहत नाहीत.ताे सर्व दृष्टींनी समत्वबुद्धीचा असल्याकारणाने भगवंत कधी उच्चनीच असा भाव मानीत नाहीत.असे भक्त संदेह असले तरी देहाविषयी आपुलकी त्यांना वाटत नाही. कारण त्यांनी आपले सर्वस्व माझ्या ठिकाणीच अर्पण केलेले असते. वडाच्या झाडाचा सर्व विस्तार जसा त्याच्या लहानशा बीजात असताे आणि हे बीज वडाच्या झाडात असते, त्याप्रमाणे मी व माझे भक्त यांच्यांत भेद असला तरी आत्मवस्तूच्या दृष्टीने आम्ही एकच असताे. उसने आणलेले दागिने अंगावर घातले तरी ते आपले नाहीत असे समजून घालणारा उदासीन असताे, त्याप्रमाणे माझे भक्त देह धारण करून उदास राहतात.
ुलांचा सुगंध वाऱ्याबराेबर वाहू लागला की नुसते ूलच झाडावर उरते. त्याप्रमाणे माझ्या भक्ताचे असते.त्याचे सर्व व्यापार चालू असले तरी त्याचा व माझा ऐक्यभाव कधी कमी हाेत नाही. अशा या अनन्य भक्ताला ताे भजन करीत असल्यामुळे काेणत्याही जातीचा असला तरी पुन्हा जन्म प्राप्त हाेत नाही.आचरणाच्या दृष्टीने ताे पापाचे शेवटचे टाेक असला तरी माझ्या भक्तीमुळे ताे मलाच येऊन मिळताे. मरणसमयी त्याला माझे स्मरण हाेत असल्यामुळे ताे मलाच येऊन मिळताे. मग ताे जरी दुराचारी असला तरी ताे पुण्यवान ठरताे. महापुरात बुडालेला मनुष्य ऐलथडीला आला की त्याचे बुडणे संपते. त्याचप्रमाणे अनन्य भक्ती केली की मागचे पाप नाहीसे हाेते.