गीतेच्या गाभाऱ्यात

18 Jan 2023 15:42:44
 
 
पत्र छत्तिसावे
 

Bhagvatgita 
 
दूध साखर व केशर ह्यांनी श्रीखंड बनवता येते व याच तीन पदार्थांनी बासुंदी बनवता येते. म्हणूनच असे सार्थत्वाने म्हणता येईल की श्रीखंड काय किंवा बासुंदी काय एकच, हे ज्याला समजले ताे शहाणा.एक श्रीखंड च य: पश्यति स पश्यति। अहंकारनाशाच्या गंधाक्षतांनी, अनास्नतीच्या पुष्पांनी, तृप्तीच्या धुपारतीने व शरणागतीच्या नैवेद्याने तू कृष्णाची पूजा कर म्हणजे तुझे कर्म अकर्म हाेईल.
चवथ्या अध्यायात पराशांती मिळेल असे म्हटले आहे.
 
पाचव्या अध्यायात मध्यंतरी नैष्ठिकी शांती मिळेल असे म्हटले आहे,तर पाचव्या अध्यायाच्या शेवटी शांती मिळेल असे म्हटले आहे.माणसाला जास्तीत जास्त जे पाहिजे असते ते म्हणजे शांति.गीतेच्या दृष्टीने-- शांती म्हणजेच मु्नती.वेदामध्ये शांतिचाच त्रिवार उच्चार केला जाताे.ॐ शांति: शांति: शांति:। तुला अकर्म साधले म्हणजे सारे साधले. ह्या अकर्मामुळेच तुला शांति मिळेल आणि तू परमानंदाच्या हिंदाेळ्यावर झाेके घेऊ लागशील.गीता ही दाई नाही, माई नाही तर आई आहे. ह्या आईच्या कुशीत तू जा म्हणजे प्रेमाने तुझ्या पाठीवर हात फिरवून ती सारे सारे तुला समजावून सांगेल.
 
(6) ध्यानयाेग सहाव्या अध्यायात ध्यानयाेग सांगितला आहे.या अध्यायात ‘‘न किंचिदपि चिंतयेत’’ असे म्हटले आहे.याचा आधार घेऊन असे म्हटले जाते की मनात काेणताही विचार येता कामा नये. मन निर्विकल्प झाले पाहिजे.मी तुला अनुभवाचे बाेल सांगताे की मनात काेणताही विचार येऊ नये अशाबद्दल खटपट करत असताना फार फार त्रास हाेताे- प्रकृतीवर परिणाम हाेताे.त्यापेक्षा मनात देवाशिवाय काेणताही विचार आणणेचा नाही असा प्रयाेग करावा.ह्याच अध्यायात- मन: संयम्य मच्चिताे यु्नत आसीत मत्पर:। असे म्हटले आहे.तू ध्यान करताना कृष्णशिवाय दुसरा काेणताही विचार मनात आणू नकाेस. देवाशिवाय दुसरा काेणताही विचार मनात येईनासा झाला म्हणजेच पारिभाषिक भाषेत मन निर्विकल्प झाले असे म्हणतात. ह्या प्रयाेगाने तुला शांति मिळेल.
 
(7) ज्ञान विज्ञान याेग.ध्यानयाेग सांगून झाल्यावर या अध्यायात ज्ञान व विज्ञान सांगण्यात आले आहे. सृष्टीत अनेक प्रकारचे जे विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वांत एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे.हे समजणे याचे नांव ज्ञान व एकाच अविनाशी परमेश्वरापासून विविध नाशवंत पदार्थ कसे हाेतात हे समजणे याचे नाव विज्ञान.भ्नताला सगळीकडे परमेश्वर दिसताे.मिल्टन लहान हाेता.शाळेत एक प्रीस्ट धर्माेपदेशक आला व मुलांना प्रश्न विचारू लागला. मुले चुकली पण छाेट्या मिल्टनने सारी उत्तरे बराेबर दिली मगप्रीस्ट म्हणाला- ‘बाळ, आता तुला शेवटचा प्रश्न विचारताे. तू या प्रश्नाचे उत्तर बराेबर दिलेस तर तुला एक संत्रे बक्षीस देईन. सांग बरे- देव कुठे आहे!
Powered By Sangraha 9.0