नाना आसने उपकर्णे । मानसपूजा मूर्तिध्याने ।।1।

17 Jan 2023 14:01:44
 
 

Saint 
भक्तीचा पाचवा मार्ग आहे अर्चन भक्तीचा! अर्चना याचा अर्थ पूजा! परमेश्वराच्या सगुण मूर्तीची विविध उपचारांनी मनापासून केलेली पूजा ही सुद्धा फळदायी असते.परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे आणि भक्तिमार्गातून साधकाने त्या निर्गुणाचीच ओळख करून घ्यावयाची असते. परंतु तेथे जाण्यासाठी आधी आधार म्हणून भगवंताच्या सगुण रूपाची संकल्पना करून त्याची पूजा आवश्यक ठरते. जसे घराच्या माडीवर जायचे आपले उद्दिष्ट असले तरी आपण एका टांगेत माडीवर पाय टाकू शकत नाही. त्यासाठी जिन्यावरून पायरी-पायरीनेच वर जावे लागते.अगदी असाच संबंध सगुण व निर्गुण भक्तीचा आहे.किंवा जसे लहान मूल एकेक पाऊल टाकायला लागले की त्याला चालायला शिकणे सुलभ व्हावे म्हणून आपण पांगुळगाडा देताे. त्याच्या आधाराने ते मूल हळूहळू चालायला शिकते आणि एकदा नीट चालायला लागले की पांगुळगाडा साेडून देते. अगदी त्याचप्रमाणे सगुणाच्या आधाराने निर्गुणाकडे जावे व निर्गुणात स्थिरावल्यावर सगुण आपाेआप सुटून जाते.
 
हाच आपल्यासारख्या जनसामान्यांचा भक्तिमार्ग आहे.श्रीदासबाधाच्या चाैथ्या दशकाच्या पाचव्या समासात श्रीसमर्थांनी अर्चनभक्तीचे विवरण केले आहे.येथेही त्यांनी सगुण पूजा म्हणजे परमेश्वराच्या मूर्तीची शास्त्राच्या व पूजामंत्रांच्या आधारे विविध उपकरणे व उपचार करून केलेली पूजा आणि मानसपूजा म्हणजे मनामध्ये इष्ट देवतेचे स्मरण करून मनानेच केलेली निर्गुण पूजा अशा दाेन्ही प्रकारच्या अर्चनभक्तीचे मार्गदर्शन केले आहे. सगुण पूजा करताना ती भगवंताचे रूप असलेल्या अग्नी, साधू, संत, संन्यासी यांची प्रत्यक्ष रीतीने किंवा भगवंताच्या धातूच्या, पाषाणाच्या, मातीच्या मूर्तीची किंवा त्याच्या चित्ररूपी तसबिरीचीही पूजा करता येते. त्याचबराेबर शुभचिन्हांकित दगड, शाळिग्राम, स्फटिक, बाण, सूर्यकांत व चंद्रकांत मणी अशांनाही देवस्वरूप मानून पूजा करता येत
Powered By Sangraha 9.0