परमात्म्याला विसरून इतर भावनेने त्याला भजल्यास कसे निष्फळ हाेते हे या ओवीत ज्ञानेश्वर सांगत आहेत.मागच्या ओवीत ते निर्देश करतात की, मला सर्व प्राण अर्पण करून जे माझी उपासना करतात, त्यांचे तितक्याच प्रेमाने मी करीत असताे. त्यांना जर माझ्या ऐक्याची इच्छा झाली तर ती इच्छा मी पुरवताे.माझी प्रेमभक्तीने सेवा करावी अशी त्यांच्या मनात इच्छा झाली तर त्यांच्या अंत:करणात मी प्रेम प्रकट करताे.जाे जाे भाव धरून भक्त माझी उपासना करतात ताे ताे भाव मी पूर्ण करताे. त्या भावाचेही रक्षण करताे. म्हणून अर्जुना, सर्व प्रेमभावाला मीच ज्यांना आश्रय वाटताे, त्यांचा याेगक्षेम मलाच चालवावा लागताे. अर्जुना, लाेक आणखीही काही देवांची व देवतांची उपासना करतात. अग्नी, इंद्र, सूर्य, साेम इत्यादी देवतांचे भजन केले जाते.
पण या सर्व देवतांत मी आहे हे भजनकर्ते जाणत नाहीत. इंद्रादि देवतांचे भजन केल्यास माझेच भजन हाेते यात शंका नाही. पण हे न जाणल्यामुळे म्हणजे माझा भाव साेडून भजन केल्यामुळे ते सरळ न हाेता वाकडे हाेते. अर्जुना, पहा ना. झाडाला ांद्या, पाने, ुले येतात, पण ते एकाच बीजाचे नाहीत काय? पण पाणी घालण्याचे काम मात्र मुळाशीच करावे लागते.इंद्रिये देहाचीच असली तरी त्या त्या इंद्रियास ते ते भाेग द्यावे लागतात. पंचपक्वान्ने करून ती कानात घालून काय उपयाेग? डाेळ्यांनी वास कसा घेता येईल? रसाचे सेवन मुखानेच केले पाहिजे. सुवास नाकानेच घ्यावयास हवा. त्याप्रमाणे भजन माझ्याच भावनेने केले पाहिजे.इतर काेणत्या तरी भावनेने भजन केल्यास ते व्यर्थ हाेते.म्हणून कर्म करावे, त्याचवेळी ज्ञानरूपी कर्माचे डाेळे निर्दाेष असावयास पाहिजेत.